शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजीबार्इंना भेटली घरची माणसं, सोशल मीडियाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:04 IST

खोपोली रेल्वे स्टेशनजवळच्या वस्तीत एक वयस्कर महिला भरकटलेल्या अवस्थेत मंगळवारी सायंकाळी सापडली. तिच्या डोळ्यांना मोतीबिंदूमुळे स्पष्ट दिसत नव्हते

नितीन भावे खोपोली : खोपोली रेल्वे स्टेशनजवळच्या वस्तीत एक वयस्कर महिला भरकटलेल्या अवस्थेत मंगळवारी सायंकाळी सापडली. तिच्या डोळ्यांना मोतीबिंदूमुळे स्पष्ट दिसत नव्हते, त्याच सोबत ती स्वत:ची संपूर्ण माहिती देऊ शकत नव्हती. सामाजिक कार्यकर्ते सुरेश वाघमारे यांनी तिची विचारपूस करून तिला खोपोलीच्या ठाणे अंमलदार विजय सूळ यांच्याकडे नेले. यानंतर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या माध्यमातून सोशल मीडियावर माहिती देवून या वृध्द महिलेचे घर शोधून तिला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे यांनी त्या महिलेचा पत्ता शोधण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरु नाथ साठेलकर, शेखर जांभळे आणि विजय भोसले यांना पाचारण केले. त्या वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारावर घाटकोपर - मुंबई येथील पत्ता व तिचे नाव सुमित्रा गणपत दिवेकर एवढे संदर्भ पुढे आले. मिळालेल्या अर्धवट माहितीवरून घाटकोपरसारख्या ठिकाणी शोध घेणे कठीण काम होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ठिकठिकाणी ही बाब प्रसारित केली गेली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था आणि सहजसेवा फाउंडेशनचे अनेक सदस्य त्याचप्रमाणे घाटकोपर पोलीस ठाण्यातील यंत्रणा शोध मोहिमेवर काम करू लागली. शेवटी साधारणपणे सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आजीबार्इंच्या घरचा पत्ता शोधण्यात यश आले. लागलीच दोन्ही पोलीस ठाण्याच्या समन्वयातून तिच्या नातलगांशी संपर्क झाला आणि उशिरा रात्री त्यांना नातेवाइकांच्या ताब्यात दिले. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजन जगताप आणि त्या आजीबार्इंचे नातेवाईक यांनी मदतीसाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले.