शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सी-व्हिजिलद्वारे मतदारांमध्ये आचारसंहितेबाबत जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 02:37 IST

सकारात्मक प्रतिसाद : मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर

जयंत धुळप 

अलिबाग : भारत निवडणूक आयोगदेखील बदलत्या काळानुसार बदलत आहे. पहिली निवडणूक देशात झाली ती प्रदीर्घ काळ चालणारी होती. मात्र, काळानुरूप बदल झाल्याने प्रशासन आणि मतदार यांच्यासाठी ती सोपी झाली आहे. आता सोशल मीडियाच्या उदयानंतर होणारी यंदाची दुसरी लोकसभेची निवडणूक आहे. १३० कोटी लोकसंख्येच्या भारतात मोबाइलधारकांची संख्या ११० कोटींपेक्षा अधिक आहे. त्यातील सुमारे ६० टक्के लोक स्मार्टफोन वापरतात ही बाब विचारात घेऊन निवडणूक आयोगाने या स्मार्टफोन वापरणाऱ्या मतदारांनाच सिटिजन व्हिजिल अर्थात ‘सी-व्हिजिल’ या मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून आचारसंहिता अंमलबजावणीकरिता जागृत करण्यात येत आहे.

तंत्रज्ञानाने अवघड वाटणाऱ्या बाबी सोप्या आणि सहज शक्य केल्या आहेत. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणे आयोगाला अपेक्षित आहे आणि त्यासाठी मतदारांची सकारात्मक मानसिकता महत्त्वाची ठरते. सामान्यपणे निवडणूक यंत्रणा काम करताना सर्वच बाबींकडे लक्ष ठेवू शकतेच असे नाही. मात्र, निवडणूक काळात अधिक सजगपणे काम करण्याची यंत्रणेला सवय असते. मात्र, यात प्रत्यक्ष मतदारांना सहभागी होता यावे, यासाठी सी-व्हिजिल हे अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान कुठे गैरव्यवहार होताना नागरिकांना आढळला तर त्यांना त्याबाबत फोटो किंवा एक-दोन मिनिटांच्या व्हिडीओसह तक्र ार या अ‍ॅपच्या माध्यमातून थेट निवडणूक आयोगाकडे करता येते. ही तक्र ार प्राप्त झाल्यानंतर ती संबंधित लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत जाते आणि त्या तक्रारीची खातरजमा करून केवळ १०० मिनिटांत कारवाई होते. याची प्रचिती रायगड लोकसभा मतदार संघातील आतापर्यंत आलेल्या ३६ तक्रारींच्या निराकरणांती आली आहे.मतदारांची भूमिका महत्त्वाचीच्प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध असणारे हे सी-व्हिजिल अ‍ॅप सर्व सुजाण मतदारांनी आपल्या मोबाइलवर डाउनलोड करून, मतदार म्हणून केवळ भूमिका न बजावता पुढे जाऊन आपल्या लोकशाहीचा सजग प्रहारी बनावे, असे आवाहन रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानraigad-pcरायगड