शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन करूनही मोबदला देण्यास टाळाटाळ, शेतातून टाकली रिलायन्स गॅस पाइपलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 02:12 IST

गॅस पाइपलाइनसाठी जमिनीचे संपादन करून त्याठिकाणी पाइपलाइन टाकण्यात आली असली, तरी संबंधित शेतक-याला अद्यापि मोबदला दिला नसल्याचे उघड होत आहे.

नागोठणे : गॅस पाइपलाइनसाठी जमिनीचे संपादन करून त्याठिकाणी पाइपलाइन टाकण्यात आली असली, तरी संबंधित शेतक-याला अद्यापि मोबदला दिला नसल्याचे उघड होत आहे. कंपनीकडून जमिनीचा मोबदला मिळत नसेल तर संबंधित पाइपलाइन काढून टाकावी, अन्यथा सात दिवसांत मोबदला द्यावा, अशी मागणी सीताराम घासे यांनी केली आहे, अन्यथा शेतात सहकुटुंब बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही घासे यांनी दहेज - नागोठणे इथेन पाइपलाइन प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) यांना निवेदनाद्वारे दिला आहे.विभागातील झोतीरपाडा येथील सीताराम तान्हू घासे यांची सर्वे नं.९१/३ ही जमीन रिलायन्सच्या गॅस पाइपलाइनसाठी घेण्यात आली आहे. जागा संपादित करताना घासे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, या जागेतून पाइपलाइन टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी किशोर लैला व देविदास अडविले यांनी १ नोव्हेंबर १७ ला संपर्ककरून बाधित क्षेत्राचे सीमांकन करणे, प्रति गुंठा ५ लाख रु पये देणे, जमीन पूर्ववत करून बांधबंदिस्ती बांधून देणे, पाइपलाइनग्रस्त दाखला देऊन रिलायन्स कंपनीत नोकरी देणे आदी अटी त्यांच्यापुढे मांडल्याचे घासे यांनी सांगितले.झोतीरपाडा येथील सर्वे नं. ९१/३ या जमिनीचा पंचनामा करून साडेचार गुंठे जमीन हस्तांतरित करण्यात येत असल्याचे सांगून पंचनाम्यावर सह्या घेतल्या. इतकेच नव्हे तर घासे यांचा मुलगा चंद्रकांतला शेतात उभे करून सर्वे नं. ९१/३ नावाची पाटी दिली व फोटो काढले आणि बाधित क्षेत्राची रक्कम धनादेशाद्वारे मिळेल असे सांगितले. या ठिकाणी पाइपलाइन टाकण्याचे काम झाल्यानंतर प्रत्यक्षात सात गुंठे जमीन बाधित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ७ गुंठ्यानुसार ३५ लाख रक्कम येणे अपेक्षित असतानाही पावणेदोन महिने उलटूनही मोबदला मिळालेला नाही.मोबदला मागितल्यानंतर टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे सहकुटुंब उपोषण करणार असल्याचे निवेदन त्यांनी पालकमंत्री प्रकाश महेता, आ. प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी, जिल्हा पो. अधीक्षक (अलिबाग), उपविभागीय अधिकारी (पेण), तहसीलदार(पेण) आणि नागोठणे पोलीस ठाणे यांना पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड