शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

शिवकालीन शस्त्र साधना करणारा अवलिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 23:28 IST

विविध शस्त्रांचा संग्रह; शैलेंद्र ठाकूर करताहेत युद्धकलेचे जतन

- संतोष सापते श्रीवर्धन : व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण त्यांच्या कृतीशील व नियमीत साधनेतून होत असते. आचार, विचार, संगत, ध्येय, स्वप्न आणि ध्यास व्यक्तीच्या आयुष्याला कलाटणी देतात. रायगड हा शिवछत्रपतीच्या राजधानीचा जिल्हा होय. त्याच जिल्ह्यात शिवकालीन युद्ध कला व शिवकालीन शस्त्र लुप्त होतांना दिसत आहेत. तेंव्हा प्राचीन ठेवा जतन करण्यासाठी श्रीवर्धनमधील शैलेंद्र ठाकूर या तरुणाने गेल्या १० वर्षात अथक परिश्रम करून विविध शिवकालीन शस्त्र जमा केले. तलवार, भाला, दांडपट्टा, ढाल, विटा, बाणा अशा शस्त्रांचा संग्रह केला त्यांनी के ला आहे. काही शस्त्र नव्याने तयार करून घेतली असल्याचे ठाकूर यांनी ‘लोकमशी’ बोलताना सांगितले.शैलेंद्र ठाकूर हे नाव श्रीवर्धनमधील सामाजिक कार्यात अग्रणी असे आहे. कराटे, मल्लखांब व शिवकालीन युद्ध कलेच्या प्रशिक्षणा व्यतिरिक्त उदरनिर्वाहासाठी विक्रम रिक्षा चालवण्याचे काम ठाकूर करतात. शिवचरित्रावर असलेल्या प्रेमातून शिवकालीन शस्त्र जमा करण्याचा छंद ठाकूरांना जडला. शस्त्र जमा करत असताना ती कशी चालवावी या जिज्ञासे पोटी ठाकूर यांनी तालुक्यातील असंख्य जेष्ठ नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्याकडून शिवकालीन युद्ध कले विषयी जाणून घेतले. शैलेंद्र कराटे प्रशिक्षक असल्याने त्यांनी या युद्ध कलेचे ज्ञान तात्काळ आत्मसात केले. आज त्या कलेचा उपयोग तालुक्यातील विविध तरुणांना होत आहे. श्रीवर्धनमध्ये होणारी शिवजयंती, गणेश उत्सव व विविध उपक्रमात शिवकालीन युद्ध कलेचे प्रत्याक्षिक शैलेंद्र दाखवतात.या पूर्वी श्रीवर्धनमध्ये शिवकालीन खेळासाठी बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तींना आमंत्रित केले जात. त्या वेळी आपण ही अशी शस्त्र चालविण्याची कला आत्मसात करावी असे ठाकूर यांनी वाटत असे. २००५ पासून ठाकूर यांनी शस्त्रसंग्रह सुरू केला होता. घरची परिस्थिती तशी बेताची असताना शस्त्र खरेदीसाठी पैसे उपलब्ध होणे जवळपास अशक्य होते तरी सुद्धा एका वेड्या छंदासाठी ठाकूर यांनी काटकसर करत शस्त्र जमा केली व ती शस्त्र चालविण्याचे ज्ञान सुद्धा आत्मसात केले. शैलेंद्र यांचे शिक्षण अवघे इयत्ता १० पर्यंत झाले आहे. घरात आई वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. घरची शेती सांभाळत शिवकालीन युद्ध कलेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ठाकूर प्रयत्नशील आहेत.सर्पमित्र म्हणून कामशस्त्रांच्या माहितीसाठी ठाकूर यांनी सातारा, पुणे, मुंबई, कोल्हापूर अशा विविध शहरात भ्रमंती केली. तरुण वर्गात इतिहासा विषयी प्रेम निर्माण व्हावे.आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमातून तरुणाईने बोध घ्यावा. आपल्या संस्कृतीचे संवर्धन व्हावे, तरुणांनी पुन्हा एकदा मैदानी खेळाकडे वळून बलदंड शरीरयष्टी बनवावी असे शैलेंद्र ठाकूर यांना वाटते.शैलेंद्र ठाकुर यांनी युद्ध कले व्यतिरिक्त इतर ही छंदाची जोपासना केली आहे, ते श्रीवर्धनमध्ये सर्पमित्र म्हणून अनेक वर्षांपासून काम करत आहेत. अभिनव भारत संघ, वी नेचर फ्रेंड या तरुणांच्या संघटनेचे ते सभासद आहेत.मी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा भक्त आहे. त्यांच्या वरील श्रद्धेतून मी शिवकालीन युद्ध कलेचा अभ्यास केला व तत्कालीन काळातील शस्त्र जमा केली. यासाठी बराच संघर्ष करावा लागला. भावी काळात श्रीवर्धन तालुक्यातील मुलांच्यासाठी शिवकालीन युद्ध कलेचा आखाडा सुरू करणार आहे. मल्लखांब व इतर मैदानी खेळात मुलांना तरबेज करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- शैलेंद्र ठाकूर