शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रायगड प्रेस क्लबचा आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान पुरस्काराचे अतुल कुलकर्णी ठरले मानकरी

By निखिल म्हात्रे | Updated: February 4, 2024 13:25 IST

निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती जेष्ठ पत्रकार सन्मान रेवदंड्याचे जेष्ठ पत्रकार अभय आपटे यांना जाहीर करण्यात आले आहेत.

अलिबाग - रायगड प्रेस क्लबचे यंदाचे सन्मान जाहीर करण्यात आले त्या मध्ये आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान दै. लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांना, जीवन गौरव सन्मान म्हसळ्याचे जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांना तसेच निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती जेष्ठ पत्रकार सन्मान रेवदंड्याचे जेष्ठ पत्रकार अभय आपटे यांना जाहीर करण्यात आले आहेत. हे सन्मान पुरस्कार १८ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजता श्रीवर्धन येथे होणाऱ्या रायगड प्रेस क्लबच्या १९ व्या वर्धापन दिनी या सन्मान सोहळ्याचे अध्यक्ष,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी दिली.

माणगाव शासकीय विश्रामगृहात रायगड प्रेस क्लबच्या कार्यकारणीची बैठक मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रायगडचे जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी यंदाचे रायगडचे सर्व सन्मान निश्चित करून आज ते जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केले.

रायगड प्रेस क्लबचे पुढील सन्मान पुरस्कार, प्रकाश काटतरे स्मृती निर्भीड पत्रकार सन्मान पुरस्कार अलिबागचे महेंद्र दुसार यांना, दिपक शिंदे स्मृती सिनिअर व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मान पुरस्कार कोलाडचे मोहन जाधव यांना, ॲड. जनार्दन पाटील स्मृतीशोध पत्रकारिता सन्मान पुरस्कार कर्जतचे दीपक पाटील यांना, संतोष पवार स्मृती युवा पत्रकार सन्मान पुरस्कार खोपोलीचे काशिनाथ जाधव यांना, डॉ. सचिन पाटील स्मृती पत्रकारिता सन्मान पुरस्कार महाडचे इलियास ढोकले यांना, सावित्रीबाई फुले महिला पत्रकार सन्मान येथील न्यूज १८ लोकमतच्या स्नेहल पाटकर ( रोहा ), ॲक्टीव्ह व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मान पुरस्कार पुनम धुमाळ, (माणगाव), सामाजिक कार्यकर्ता सन्मान पुरस्कार पेणचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांना जाहीर करण्यात आले. विशेष सन्मान श्रीवर्धनचे जेष्ठ पत्रकार विजय गिरी यांना जाहीर करण्यात आले आहेत. रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे सन्मान श्रीवर्धनचे संतोष रेळेकर आणि रोह्याचे रवींद्र कान्हेकर यांना जाहीर करण्यात आले आहेत.

टॅग्स :LokmatलोकमतJournalistपत्रकारalibaugअलिबाग