शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

उरण येथील शाळेतील विशेष मुलांनी बनविल्या आकर्षक राख्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 17:09 IST

उरण शहरात स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान संचलित विशेष मुलांची शाळा आहे.

- मधुकर ठाकूर 

उरण : उरण शहरातील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान संचलित सीबर्ड (स्वीकार) असलेल्या या विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सणासाठी रंगीबेरंगी, आकर्षक राख्या बनविल्या आहेत.  उरण शहरात स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान संचलित विशेष मुलांची शाळा आहे. या शाळेत विशेष मुले दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणासाठी आकर्षक राख्या बनवून विक्री करतात.या राख्या युईएस शाळा, सेंटमेरी कॉन्व्हेंट स्कूल , उरण कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय,लिटील मास्टर  आणि पालक या राख्या  खरेदी करून विद्यार्थी , संस्थेच्या मदतीसाठी हातभार लावतात.  विक्रीसाठी ठेवण्यात येणाऱ्या या राख्यांचे अनेक प्रकार आहेत. गोंडा , खड्यांची , मोत्यांची  असे अनेक राख्यांचे प्रकार असतात.  तीन  रुपयांपासून ते २५ रुपयांपर्यंत किंमतीच्या राख्या येथे उपलब्ध असतात. शाळेच्या पर्यवेक्षक माधुरी उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश म्हात्रे, मानसी पांचाळ, पल्लवी परदेशी,  साक्षी दांडेकर , प्रशांत कदम, गणेश जाधव,  ,अस्मिता भोईर , आदी शिक्षक मुलांना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड