शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सुधागडात बिबट्यांचा वावर?; नवघरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 23:41 IST

वनविभागाला दिली माहिती

- विनोद भोईर पाली : सुधागड तालुका हा प्रामुख्याने घनदाट जंगल, डोंगर कपारीत, दऱ्या खोऱ्यांमध्ये वसलेला तालुका आहे. सुधागडच्या सभोवताली सह्याद्री पर्वतांच्या रांगा आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. वन्यजीवांचा वावर हा या ठिकाणी सर्रास आढळून येतो. अशाच प्रकारे सुधागडातील आसरे-नवघर गावापासून काही मीटरच्या अंतरावर असलेल्या जंगलातून सलग १५ दिवस दोन बिबट्यांचा वावर आढळून आल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाला माहिती कळविण्यात आली आहे.

नवघर येथील आदिवासीवाडीलाच लागून असलेल्या जंगलातून दोन बिबटे रोज पाण्याच्या शोधात जंगलातून खाली उतरत असताना, तेथील शेतात काम करणारा मजूर दत्ता बारकू हिलम याने पहिले. एवढेच नसून त्या बिबट्याने एक बैल मारल्याचेदेखील दत्ता हिलम यांनी निदर्शनास आणून दिले. बिबट्यांचा वावर हा सतत काही दिवस असल्याने त्यांनी ही बाब गावकºयाच्या निदर्शनास आणून दिली.

तत्काळ नवघर ग्रामपंचायतीतील सदस्यांनी व गावकºयांनी ही बाब वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळवली, त्यानुसार वनक्षेत्र अधिकाºयांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेत त्या ठिकाणी वनपाल बी. डी. कराडे यांच्यासमवेत वनरक्षक जे. एम. गायकवाड, मुकेश पाटील व एस. बी. चव्हाण यांच्या देखरेखीखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वन्यप्राण्यांच्या बाबतीत कशा प्रकारे सतर्कता बाळगावी, या बाबतीतही अधिकाºयांनी गावकºयांमध्ये जनजागृती केली. तसेच गावकºयांच्या जीवितास धोका पोहोचणार नाही, याबाबतची उपाययोजना वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी करावी, असेही गावकºयांकडून सांगण्यात येत आहे.

नागरिकांनी वा गावकऱ्यांनी कोणीही त्या ठिकाणी जाऊ नये, जंगल हे वन्यप्राण्यांचे घर आहे. प्राणी आपल्या बचावासाठी प्रतिहल्ला करतात, त्यासाठी आपण त्यांना उकसाऊ नये, तसेच प्रत्येक नागरिकाने, गावकऱ्यांनी आपापल्या जीवाची पर्वा करून सतर्कता बाळगावी. लहान मुलांना त्या ठिकाणी पाठवू नये. रात्रीच्या वेळेस दरवाजे-खिडक्या बंद कराव्यात.- समीर शिंदे, वनक्षेत्रपाल,पाली-सुधागड

आसरे-नवघर गावालगत काही मीटरच्याच अंतरावर जंगल असल्याने बिबट्याच्या दहशतीने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे; परंतु वनरक्षक अधिकाºयांनी त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्हास सहकार्य करावे.- विवेक रोकडे, सदस्य, नवघर ग्रामपंचायत

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्रleopardबिबट्या