शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमधून फरार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 04:43 IST

सागर पाटील खून प्रकरण । २७ मेपर्यंत पोलीस कोठडीचे न्यायालयाचे आदेश

अलिबाग : कुरुळ येथील दत्त टेकडी परिसरात झालेल्या सागर पाटील खुन प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र प्रकाश मगर व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण या दोघांना गाणगापूर (कर्नाटक) येथे अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी जितेंद्र मगर यांचा मोठा भाऊ गुन्ह्यातील मुख्य आरोपी राजेंद्र मगर यांचे वडिलोपार्जित मिळकतीवरून वाद होते. आरोपी राजेंद्र याने त्याच्या कटात आरोपी नीलेश वाघमारे (रा. गोविंद बंदर, अलिबाग) व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण (रा. हवेली, पुणे) यांना सामील करून घेतले. १ एप्रिल रोजी मध्यरात्री जितेंद्र हे मित्रांसह कुरुळ-दत्तटेकडी येथून कुरुळ गावाकडे येत असताना, टेकडीच्या पायथ्याशी दबा धरून बसलेल्या तिघांनी गोळीबार करून सागर पाटील यांचा खून केला. तर यात गौरव चंद्रकांत भगत (रा. कुरुळ) यांस जखमी केले होते. या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नीलेश दशरथ वाघमारे यास पकडण्यात पोलिसांना तत्काळ यश आले होते; परंतु राजेंद्र प्रकाश मगर व समीर उर्फ कुलदीप लालदेव चव्हाण हे फरार झाले होते. या दोघांचा पुणे, मुंबई, कोल्हापूर येथे शोध घेण्यात आला. हे दोघेही वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नाव धारण करून वावरत होते. या तपासादरम्यान पथकास मिळालेल्या माहितीनुसार यातील या दोघा आरोपींना गाणगापूर (कर्नाटक) येथे मोठ्या अटक करण्यात आली. रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व अलिबाग पोलीस यांच्या संयुक्त शोधपथकाने ही कारवाई के ल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख यांनी दिली आहे.दोघांनाही पोलीस कोठडीराजेंद्र मगर व समीर चव्हाण या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही २७ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे हे करीत आहेत.