शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

भरत गोगावलेंना डावलल्याने नाराजी; रायगडमध्ये शिवसैनिक राजीनाम्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:35 IST

हॅट्ट्रिक करूनही मंत्रिमंडळात स्थान नाही

दीपक साळुंखे बिरवाडी : महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांचा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये समावेश न झाल्याने जिल्ह्यामधील सामान्य शिवसैनिक नाराज झाला आहे. गोगावले यांना मंत्रिपद द्या, या मागणीकरिता शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपला राजीनामा थेट मातोश्रीवर पाठविण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे तीन आमदार, १८ जिल्हा परिषद सदस्य, अनेक नगरसेवक, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती व अनेक ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या समीकरणांमध्ये रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेले असल्याने तसेच तीन वेळा निवडून आलेले आमदार भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने सामान्य शिवसैनिक नाराज आहेत. शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये ही नाराजी व्यक्त करण्यात आली. सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी आपले राजीनामे मातोश्रीवर पाठवणार आहेत. या बैठकीसंदर्भात कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे. शिवसैनिकांच्या नाराजीची दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगडमधील शिवसेना संघटनेला न्याय देणार का? की पुन्हा रायगड जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात फक्त सुनील तटकरेंचा दबदबा कायम राहणार, अशी चर्चा सध्या आहे.

जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांनी मोठा संघर्ष करून विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद वाढविली आहे. यामध्ये अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी विजय संपादन करून शिवसेना संघटनेला नवीन उभारी दिली. तर महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी विजयी हॅट्ट्रिक केल्याने पक्षनेतृत्व रायगडला मंत्रिपदाचा मान देतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांना होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर बदललेल्या राजकीय गणितांचा फटका जिल्ह्यामधील शिवसेना संघटनेला अधिक बसल्याची भावना सामान्य शिवसैनिकांमध्ये तयार झाली आहे.ग्रामपंचायत ते थेट लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना संघटनेचे काम करून निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना पक्षाकडूनच न्याय दिला जाणार नसेल तर मातोश्रीवर राजीनामा पाठवून लक्ष वेधण्याचा निर्धार शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष यांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करून निवडून आलेले आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयामुळे शिवसेनेची ताकद रायगड जिल्ह्यामध्ये वाढलेली असताना पक्ष नेतृत्वाने रायगड जिल्ह्याकडे पाठ फिरवत मंत्रिमंडळात रायगडचे आमदार भरत गोगावले यांना स्थान न दिल्याने महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे रायगडमध्येही शिवसेना पक्षात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस