शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंग्रे समाधी स्थळ सुशोभीकरणात खोडा, पुरातत्त्व विभागाने केले प्रश्न उपस्थित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 12:25 IST

अडीच महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम ठप्प आहे. उपस्थित केलेल्या प्रश्नाचे निरसन करून पुढील काम सुरू होईल, असे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी म्हटले आहे. 

अलिबाग : स्वराज्यातील आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे अलिबाग शहरात समाधीस्थळ आहे. आंग्रे यांच्या समाधीस्थळ परिसराचे सुशोभीकरण काम अलिबाग नगर परिषदेच्या माध्यमातून सुरू होते. या कामाबाबत पुरातत्त्व विभागाने काही प्रश्न उपस्थित केल्यामुळे हे काम थांबवले आहे. अडीच महिन्यांपासून पुरातत्त्व विभागाच्या हस्तक्षेपामुळे हे काम ठप्प आहे. उपस्थित केलेल्या प्रश्नाचे निरसन करून पुढील काम सुरू होईल, असे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी म्हटले आहे. 

 २१ जानेवारीला राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे, आ. महेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांच्या उपस्थितीत आंग्रे यांच्या समाधीस्थळ परिसर सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला होता. संरक्षक भिंत आणि आरमारी नौकेची प्रतिकृती उभारणीचे काम हाती घेतले होते. प्रादेशिक पर्यटन योजनेतून दोन कोटी सुशोभीकरण कामासाठी मंजूर झाले आहेत. अजून तीन कोटी निधीची गरज असून, पाच कोटी रुपये खर्च होणार आहे. 

पर्यटनाच्या दृष्टीने आंग्रे समाधी स्थळ दुर्लक्षितअलिबाग हा पर्यटनासाठी उत्तम तालुका आहे. मात्र, अलिबागमध्ये येणारे बहुतांश पर्यटक हे समुद्र पर्यटन करून माघारी फिरतात. मात्र सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधी स्थळाला भेट देत नाहीत. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हे स्थळ दुर्लक्षित राहिले आहे. आंग्रे समाधी स्थळालाही पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी, यासाठी परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, त्याला पुरातत्व विभागाने खोडा घातला आहे. 

ही कामे होती सुरूसमाधीस्थळ उद्यानाच्या प्रवेशद्वारावर भव्य गलबताच्या प्रतिकृतीची उभारणी करणे, किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारणे, दीपमाळांची उभारणी करणे, कान्होजी राजे आंग्रे यांच्या जीवनावरील म्यूरल्स तयार करणे यासाठी लागणारी आवश्यक बांधकामे ही कामे या योजनेअंतर्गत केली जाणार आहेत. जानेवारीत या कामाला सुरुवात केली होती. त्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया, तांत्रिक मान्यताही प्राप्त झाल्या. त्यामुळे काम पूर्ण झाल्यानंतर आंग्रे समाधी स्थळाकडे पर्यटकही आकर्षित होतील. मात्र पुरातत्व विभागाने काही प्रश्न उपस्थित केल्याने हे काम थांबविले आहे.   

सरखेल कान्होजी आंग्रे समाधी स्थळाचे सुशोभीकरण काम सुरू झाले होते. पुरातत्व विभागाने काही कामांच्या बाबतीत शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे काम थांबले आहे. पुरातत्व विभागाच्या शंकाचे निरसन केले जात आहे. लवकरच काम पुन्हा सुरू होईल. -अंगाई साळुंखे, मुख्याधिकारी, अलिबाग नगर परिषद

टॅग्स :Raigadरायगड