शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
3
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
4
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
5
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
6
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
8
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
9
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
10
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
11
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
12
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
13
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
14
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
15
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
16
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
17
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
18
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
19
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
20
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!

आंग्रे घराण्याचे कुलदैवत तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:43 IST

तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : तपोभूमी म्हणून प्रसिद्ध रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर येथे अनेक ऋ षीमुनी व शिवभक्तांनी तपश्चर्या केली असल्याने या शिव देवस्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कनकेश्वरच्या निसर्ग रमणीय देवराईत परमेश्वराचे अस्तित्व असल्याची दृढ श्रद्धा आहे. अत्यंत प्राचीन अशा या कनकेश्वर देवस्थानास पौराणिक पार्श्वभूमी देखील आहे. कनकेश्वर हे एक अतिप्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. कनकेश्वराचे दर्शन घेतल्याने त्रिभुवनांतील शिवलिंगाचे दर्शन केल्याचे पुण्य लाभते अशी श्रद्धा आहे. दर श्रावणी सोमवारी भाविकांची येथे मोठी गर्दी असते.कनकेश्वराच्या दर्शनासाठी जाण्याकरिता पायथ्याच्या मापगाव या गावातून ७५० पायºया चढून जावे लागते. सरखेल राघोजीराजे आंग्रे यांचे तत्कालीन दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकाने सन १७६४ मध्ये या पायºया व मंदिरासमोरील पुष्करणीचे बांधकाम स्वखर्चाने केले. या ७५० पायºयांमध्ये देवाची एक पायरी आहे. देवाने काम पाहावे, या गोविंद रेवादास त्यांच्या इच्छेनुसार देवाने काम पाहून येथे पावलाचा ठसा उमटवला आहे,अशी आख्यायिका येथे आहे. या पर्वतावर अनेक देवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्याचे कुलदैवत आहे. पूर्वी देवस्थानची व्यवस्था आंग्रे सरकारकडून होत असे.मंदिराच्या सभोवतालचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील देवराईचे उत्पन्न हे कनकेश्वर देवस्थानकरिता वापरले जात असे. सरकारी दप्तरी हा डोंगर ‘देवाच्या’ नावे नोंदलेला आहे. राघोजी आंग्रे यांनी सवाई माधवराव पेशव्यांकडून इ.स.१७७६ मध्ये पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे कार्तिकातील त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारी कनकेश्वराची यात्राअसते.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कनकेश्वराच्या दोन दंतकथा आहेत. या तपोभूमीवर कनकासुर नावाच्या राक्षसाने शिवदर्शनार्थ उग्र तपश्चर्या केल्यामुळे शंकरमहादेवांनी प्रसन्न होऊन त्यास दोन वर दिले. त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे कनकासुर व शंकराचे युद्ध झाले. त्यातील त्या राक्षसाचे सामर्थ्य पाहून शंकराने पुन्हा प्रसन्न होऊन राक्षसाला उद्धार होईल असा दुसरा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कनकासुराने त्याचे व देवाचे दोघांचेही वास्तव्य या डोंगरावर कायमचे राहावे असा वर मागितला. त्यांच्या सिद्धतेकरिता शंकराने राक्षसाला पालथे झोपण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासुर भस्मसात होऊन त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कनकेश्वर हे नाव प्राप्त झाले.