शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाड तालुक्यातील अंगणवाड्या धोक्यात !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:43 IST

भरतीला स्थगिती; १६ अंगणवाडी सेविका, २३ मदतनिसांची पदे रिक्त

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यात अंगणवाडी सेविकांची १६ पदे रिक्त असून अंगणवाडीवर लागणाऱ्या मदतनिसांच्या देखील २३ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांमुळे महाडमधील अंगणवाड्या धोक्यात आल्या आहेत. तालुक्यातील काही गावांत अंगणवाडी सेविकांच्या शैक्षणिक पात्रतेच्या अटीतील उमेदवार मिळत नसल्याने काही अंगणवाड्या मंजूर असूनदेखील सुरू झालेल्या नाहीत.ग्रामीण भागातील तरुणांच्या स्थलांतरामुळे गावे ओस पडू लागली आहेत. याचा परिणाम गावातील शाळा आणि अंगणवाड्यांवर होत आहे. यामुळे महाडच्या अनेक अंगणवाड्यांवर बालकांची संख्या घटत चालली आहे. गावातील तरु ण वर्ग मोठ्या प्रमाणावर नोकरी आणि व्यवसायासाठी शहरात गेले असून त्याच ठिकाणी स्थायिकदेखील झाले आहेत. शिवाय, शहरामध्ये प्ले हाउस, नर्सरीसारखे नवे प्रयोग आल्याने नागरिकांमध्ये याची क्रे झ वाढली आहे. यामुळे शासकीय अंगणवाड्यांवर विविध सुविधा उपलब्ध असताना देखील ओस पडत आहेत. येथे प्रवेश घेणाºयांची संख्या प्रत्येक वर्षाला घटत आहे.पोषण आहार, मोफत आरोग्य तपासणी आणि औषधे, मुलांना खेळण्यासाठी खेळणी, बालकांच्या मातांची आरोग्य तपासणी आदी सुविधा या ठिकाणी मिळतात, तरी देखील प्ले हाउसच्या हौसेमुळे या बालकांना अल्प वयातच कठीण शिक्षणाची पायरी पालक चढवत आहेत.तालुक्यातील जिते तेरडेवाडी, गारपाटले, गोंडाळे कुडवेवाडी येथे अंगणवाडी मंजूर आहेत. मात्र, २१ ते ३० वयोगटातील महिला किंवा मुली १० वी पास शिक्षण घेतलेल्या मिळत नाहीत. वर्षभरापूर्वी याबाबत जाहिरात प्रसिद्ध करूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याचे महिला बाल कल्याण विकास प्रकल्पाकडून माहिती देण्यात आली. त्यातच महिला बालकल्याण विभागाकडून २०१७ मध्ये अंगणवाडी सेविका पदांच्या भरतीबाबत स्थगिती आदेश देण्यात आला आहे, यामुळे ही पदे रिक्त राहिली आहेत.कमी पटसंख्या कारणीभूतमहाड तालुक्यात जवळपास २० अंगणवाड्या कमी पट संख्येत आहेत. किमान १० च्या आत असलेल्या या अंगणवाड्या आहेत. यामुळे भविष्यात या अंगणवाड्या बंद पडण्याची शक्यता आहे.महाड तालुक्यात मिनी अंगणवाड्यांवर १६ सेविकांची पदे रिक्त आहेत, तर अंगणवाडी सेविकांची १० पदे, मदतनिसांच्या २३ जागा रिक्त आहेत. ग्रामीण भागातील स्थलांतरामुळे शिक्षण घेतलेल्या मुली किंवा महिला मिळणे कठीण झाले आहे.अंगणवाड्या बंद पडण्याची शक्यतारिक्त पदांची संख्या आणि ग्रामीण भागातील स्थलांतर यामुळे गावातील अंगणवाड्या ओस पडू लागल्या आहेत. भविष्यात अंगणवाडी बंद पडणे ग्रामीण भागाला धोकादायक आहे. ग्रामीण भागात दिल्या जाणाºया सुविधा, आरोग्य तपासणी, लसीकरण, जनगणना आदी शासकीय कामातदेखील अंगणवाडी सेविकांचे योगदान असते, यामुळे ग्रामीण भागात अंगणवाडी सुरू राहणे महत्त्वाचे आहे.महाड तालुक्यात ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविकांची पदे रिक्त आहेत. याबाबत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मात्र, काही गावांत शैक्षणिक अट असलेल्या महिला उपलब्ध न झाल्याने अंगणवाडी सुरू करता आल्या नाहीत तर महिला बाल कल्याण विभागाकडून नवीन भरतीबाबत स्थगितीदेखील आहे.- राजेश्री बने, बाल विकास प्रकल्प अधिकारी, महाड