शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

...अन् डेक्कन क्वीन कर्जतला थांबलीच नाही; प्रवाशांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 00:39 IST

नाहक त्रास : गाडीने थेट दादर स्थानक गाठल्याने नाराजी

कर्जत : घाटातील कामामुळे सकाळी पुण्याहून मुंबईला जाणारी प्रगती एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरिता प्रगती एक्स्प्रेस रद्द असेपर्यंत पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, या मागणीचा विचार करून डेक्कन क्वीन बुधवारपासून कर्जतला थांबविली जाणार असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले; परंतु डेक्कन कर्जतला न थांबताच थेट दादर स्थानकावर थांबल्याने काही प्रवाशांना पकडले.

काहींनी वस्तुस्थिती सांगितल्यावर त्यांना सोडून देण्यात आले, त्यात वेळ वाया गेला आणि मानसिक त्रास झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्तके ला. खंडाळा घाटात मंकी हिल ते कर्जत दरम्यान रेल्वे लाइनच्या कामामुळे अनेक गाड्या रद्द केल्या आहेत, तर काहींचे मार्ग बदलले आहेत. प्रगती एक्स्प्रेससुद्धा रद्द करण्यात आली आहे. ही गाडी रद्द आहे तोपर्यंत डेक्कन क्वीन कर्जतला थांबवावी, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी केली होती, ती मान्य करून बुधवारपासून डेक्कन क्वीन कर्जतला थांबणार होती. असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून अधिकृतपणे टिष्ट्वट करण्यात आल्याने याबाबत काही उत्साही प्रवाशांनी याबाबतची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली. त्यामुळे कर्जतला उतरणारे प्रवासी या गाडीने प्रवास करीत होते; परंतु गाडी कर्जतला न थांबता थेट दादरला जाऊन थांबली. या प्रकाराने प्रवाशांना नाहक त्रास झाला. काही प्रवाशांना कर्जतपर्यंतचे तिकीट असल्याने पकडण्यात आले. त्यामध्ये त्यांचा वेळ वाया गेला आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. ही गाडी कर्जतवरून सकाळी सुमारे ९ च्या दरम्यान जाते. कर्जतचे सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी बुधवारी सकाळी ८ वाजता माहिती घेण्यासाठी कर्जत स्थानकप्रमुखांशी संपर्क केला. त्यांनी डेक्कन क्वीन कर्जतला थांबण्याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची सूचना नसल्याचे सांगितले. यावरून रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेKarjatकर्जत