शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

...आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून गाठले दरडग्रस्त गाव, १५० ग्रामस्थांना हलवले सुरक्षित ठिकाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 03:04 IST

गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता, तर काही डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावर राहणारे नागरिक भयभीत झाले होते.

- आविष्कार देसाईअलिबाग : गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. बऱ्याच गावांचा संपर्क तुटला होता, तर काही डोंगराला भेगा पडल्याने डोंगरावर राहणारे नागरिक भयभीत झाले होते. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचेल की नाही याची त्यांना शाश्वती नव्हती, कारण त्यांच्यापर्यंत चारचाकी वाहन पोहोचू शकणार नव्हते. त्याच वेळी जिल्हाधिकारी थेट मोटारसायकलवरून अलिबाग तालुक्यातील खानाव-वेलटवाडी येथे शनिवारी पोहोचले. जिल्हाधिकारीच आल्याने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण झाला.वेलटवाडी हे गाव डोंगरावर असल्याने गाडी जाणार नाही हे लक्षात येताच जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी मोटारसायकल आहे का अशी विचारणा केली. माजी सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी मोटारसायकलची व्यवस्था केली. जिल्हाधिकारी हे गोंधळी यांच्याच मोटारसायकलवर बसून डोंगराकडे जाण्यास निघाले. तालुक्यातील रेकॉर्डब्रेक पावसामुळे खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वेलटवाडी डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. त्या वेळी घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, खानावचे माजी सरपंच जितेंद्र गोंधळी, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, महसूल कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन वस्तीवरील सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. सुमारे १५० नागरिकांना सुरक्षितपणे डोंगराच्या खाली खानाव गावात आणून खानाव प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाचे सभागृह तसेच खानाव बाजार येथे त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आपदग्रस्त गावाची पाहणी करून स्थानिक ग्रामस्थ, खानाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी व माजी सरपंच जितेंद्र गोंधळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांना सुरक्षित जीवन जगता यावे याबाबत सरकारने मदत करावी, अशी विनंती केली. जिल्हाधिकारी यांनी डोंगराच्या खाली नवीन गावठाण केले तर तुमची राहायची तयारी आहे का अशी विचारणा केल्यावर ग्रामस्थांनी त्यास सहमती दर्शविली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी नवीन गावठाण तयार झाल्यावर पुन्हा डोंगरावर रहायला तर जाणार नाही ना असा सवालही केला, परंतु ग्रामस्थांनी पुन्हा डोंगरावर जाणार नसल्याचे सांगितले.माझ्या जिल्ह्यातील नागरिक जीव धोक्यात घालून राहणार नाही. आपत्ती कधीच सांगून येत नाही. वेलटवाडी येथील नागरिकांना गावठाण जमीन देऊन तेथे त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत पालक मंत्र्यांशी चर्चा झाली आहे. त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे, तसेच लवकरच प्रस्ताव तयार करून यावर निर्णय घेण्यात येईल, असे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.प्रधानमंत्री आवास योजनेतून त्यांना घरे देण्यासाठी लवकरच प्रस्ताव तयार करण्यास जिल्हाधिकारी यांना सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी दरडप्रवण क्षेत्र आहेत. याबाबत जिओग्राफिकल सर्व्हे नेमका काय आहे याची वाट पाहत आहोत. - रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, रायगड

टॅग्स :Raigadरायगड