शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीवर ‘सीएसआर’ची मात्रा

By admin | Updated: June 20, 2016 02:27 IST

आपत्तीसोबत दोन हात करण्यासाठी रायगड जिल्ह्याचा सूक्ष्म प्रकल्प अहवाल येत्या १५ दिवसांत तयार करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारा सुमारे ८० लाख रुपयांचा निधी

आविष्कार देसाई,  अलिबागआपत्तीसोबत दोन हात करण्यासाठी रायगड जिल्ह्याचा सूक्ष्म प्रकल्प अहवाल येत्या १५ दिवसांत तयार करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारा सुमारे ८० लाख रुपयांचा निधी जिल्ह्यातील कंपन्यांनी आपापल्या सीएसआर (कॉपोरेट सोशल रिस्पॉसिबीलीटी) मधून खर्च करण्यासही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा आर्थिक कणा आता मजबूत होण्यास मदत मिळणार आहे.जिल्ह्यात पावसाला म्हणावी तशी अद्याप सुरुवात झालेली नाही. परंतु यंदा पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त बरसणार असल्याचा अहवाल हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पूररेषेत असणाऱ्या २२०, तर दरडग्रस्त असणाऱ्या ८४ गावांना मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो. त्याचप्रमाणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने कंपन्यांचे जाळे पसरलेले आहे. ५६ अतिघातक रासायनिक कंपन्या आहेत, तर त्यांच्या खालोखाल ४५९ अन्य कंपन्यांचा नंबर लागतो. त्यामुळे अख्खा रायगड जिल्हा हा ज्वलनशील, अतिघातक रसायनाने व्यापला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा हे दोन महामार्ग जातात. तसेच जिल्ह्यातून कोकण रेल्वेही धावते. या सर्व ठिकाणी अपघात होऊन आपत्ती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा सर्व अपघातांच्या ठिकाणी वेळेत मनुष्यबळ, औषधे, रुग्णवाहिका, अन्न, पाणी यांच्यासह पोचणे हे फार मोठे आव्हान असते. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम असण्यासाठी तिला आर्थिक निधीचेही पाठबळ असणे महत्त्वाचे आहे. यासाठीच जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत जिल्ह्यातील विविध कंपन्यांना त्यांच्या सीएसआर फंडातून निधी खर्च करण्याबाबत जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी आवाहन केले. एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांनी समन्वय साधून काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी जिल्ह्याचा सूक्ष्म प्रकल्प अहवाल येत्या १५ दिवसांत तयार करण्याची जबाबदारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला देण्यात आली.याप्रसंगी औद्योगिक व आरोग्य सुरक्षा विभागाचे सहसंचालक एस.पी.राठोड, उपसंचालक दीपक सोनावणे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध कंपन्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आॅफ साईट डिझास्टर मॅनेजमेंट आराखडा प्रसिध्द करण्यात आला. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने या आराखडा पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.येत्या १५ दिवसांत सूक्ष्म प्रकल्प अहवाल तयार करण्यात येईल. त्यामध्ये पुढील पाच वर्षांचा समावेश असेल. जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी हा तुटपुंजा आहे. कंपन्यांनी हात बळकट केल्यास आपत्तीशी मुकाबला करणे अवघड नाही. सुमारे ८० लाख रुपयांचा निधी उभा करणे हे मोठे आव्हान आहे.- सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी