संतोष सापते
श्रीवर्धन : तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयातील दोन्ही रुग्णवाहिका एक महिन्यापासून नादुरुस्त आहेत. गंभीर अपघात व गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक उपचारासाठी इतरत्र दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत, तसेच शहरात कुठेच खासगी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक व यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण होत आहे.
२०१४ मध्ये श्रीवर्धन शहरात करोडो रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालयाची वास्तू निर्माण करण्यात आली. तालुक्यातील गोरगरिबांना दर्जेदार व नियमित आरोग्य सेवा उपलब्ध होणे अभिप्रेत आहे. उपजिल्हा रु ग्णालयात ५० (बेड) आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यासाठी ४८ कर्मचाऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक एक, वैद्यकीय अधिकारी ७, अधिपरिचारिका १२, परिसेविका २, अधिसेविका २, लिपिक २, औषध निर्माण अधिकारी २, प्रयोगशाळा तज्ज्ञ १ व प्रयोगशाळा सहायक १ त्यापैकी वैद्यकीय अधिकारी दोन पदे रिक्त आहेत.श्रीवर्धन तालुका हा दळणवळणाच्या दृष्टीने अडचणींचा आहे. माणगाव ते श्रीवर्धन ४८ किमीचे अंतर पूर्ण करण्यासाठी कमीत कमी दीड दोन तास लागतात.गंभीर अपघात झाल्यास रुग्णवाहिकेची आवश्यकता असते. १०८ नंबरची रुग्णवाहिका श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना सहजासहजी उपलब्ध होत नाही. कारण सदरच्या नंबरवर अपघात किंबहुना इतर रुग्णांची माहिती कळल्यानंतर दोन तास तरी कुठलीच कार्यवाही केली जात नसल्याचे रु ग्णाच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. १०८ नंबरच्या रुग्णवाहिका फक्त रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सेवा देतात, जिल्ह्याच्या बाहेर सेवा पुरवण्यात त्या असमर्थ आहेत. रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे अनेक रु ग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसे रुग्णवाहिकेविषयी संताप व्यक्त करत आहेत.तालुक्यात ७८ गावांतील रुग्णांचे हालच्आजमितीस श्रीवर्धन तालुक्याची लोकसंख्या ८५,०४० च्या जवळपास आहे. तालुक्यात ग्रामीण भाग जास्त आहे. ७८ गावातील लोक आरोग्य सेवेसाठी उपजिल्हा रु ग्णालयावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत रु ग्णांना वेळेवर रुग्ण वाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे. श्रीवर्धन तालुक्याव्यतिरिक्त जवळच्या म्हसळा व माणगाव परिसरातील अनेक रुग्ण उपचारासाठी श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ रु ग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.उपजिल्हा रु ग्णालयाच्या दोन्ही रु ग्णवाहिका नादुरु स्त झाल्यामुळे दुरु स्तीसाठी पाठवल्या आहेत. लवकरच त्या रु ग्णांसाठी उपलब्ध होतील. सदरच्या रु ग्णवाहिका वारंवार नादुरु स्त होत आहेत त्या संबंधी अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठवत आहे.- डॉ. मधुकर ढवळे,वैद्यकीय अधीक्षक,उपजिल्हा रु ग्णालय श्रीवर्धनदोनपैकी एक रुग्णवाहिका पुणे येथील टाटा कंपनीच्या कार्यशाळेत तर दुसरी रुग्णवाहिका जसवली येथे दुरु स्तीसाठी पाठवली आहेपंधरा दिवसांपूर्वी माझा मुलगा दत्ता साळुंखे याचा अपघात झाला त्या वेळी उपजिल्हा रु ग्णालयात रु ग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे खासगी वाहनाने पुढील उपचारांसाठी जावे लागले, तरी लवकरात लवकर श्रीवर्धन रु ग्णालयात रु ग्णवाहिका उपलब्ध व्हावी.- विनायक साळुंखे, रहिवासी श्रीवर्धन