शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीतील तिन्ही पक्षांचा रायगड लोकसभेवर दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 07:31 IST

ग्रामपंचायत निवडणुकीवरून शिंदे गट-भाजपत संघर्षाची ठिणगी

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) असलेल्या रायगड मतदारसंघावर आधी भाजप आणि आता शिवसेनेच्या शिंदे गटाने दावा केल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादीचे नेते मात्र या वादापासून तूर्त दूर आहेत.

त्यातच अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवरून शिंदे गट आणि भाजप यांच्यात धुसफूस सुरू झाली आहे. शिंदे गटाने पराभवाचे खापर भाजपवर फोडले आहे. पंचायत निवडणुकीत शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी युती होती. मात्र, भाजपने अनेक ग्रामपंचायती स्वबळावर लढवल्या. शिंदे गटाकडून लढविण्यात आलेल्या ग्रामपंचायतींमध्ये भाजपने आपले उमेदवार उभे करून शिंदे गटासमोर पर्यायाने आमदार महेंद्र दळवी यांच्यासमोर आव्हान उभे केले. भाजपच्या या खेळीने शिंदे गटाला तीनच ग्रामपंचायतींवर विजय मिळवता आला, तर बाकी ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अलिबागमध्ये आले असताना त्यांनी रायगडाच्या खासदारपदावर दावा केला होता. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपच्या या खेळीने मित्र पक्ष शिंदे गटाला मात दिली. 

भाजपने सुधारावे, अन्यथा...  शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांचा सत्कार होरीजन सभागृहात झाला. यावेळी जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचे खापर भाजपवर फोडले.  भाजपने सुधारावे अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला. रायगडची लोकसभेची जागा शिवसेनेची असल्याचा दावाही दळवी यांनी केला. 

टीका करताना भान राखाग्रामपंचायतीत काही ठिकाणी आम्ही युतीत लढलो, तर काही ठिकाणी स्वबळावर लढलो. जिथे सोबत होतो तिथे शिंदे गटाला यश मिळाले. आम्ही प्रामाणिक राहिलो. आमचे काम ए टीमचेच आहे. त्यामुळे भाजप किंवा पदाधिकारी, नेते यांच्यावर टीका करताना भान ठेवा, असे प्रत्त्युत्तर भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी दिले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग