शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अलिबागचा प्रवास महागणार; गेट वे - मांडवा तिकीट दरात १५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 06:30 IST

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग तालुक्यातील मांडवादरम्यान दरवर्षी जवळपास १५ लाख प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेत असतात.

अलिबाग : अलिबागवरून मुंबईसाठी अथवा मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी हल्ली चाकरमानी प्रवासी सागरी मार्गाचा पर्याय निवडत आहेत. मुंबई ते अलिबाग हे अंतर एसटी किंवा इतर वाहनांपेक्षा सागरी मार्गाने कमी वेळात गाठता येते. म्हणून दररोज असंख्य प्रवासी या सागरी मार्गाचा उपयोग करतात. परंतु काही दिवसांपूर्वी कोणतीही पूर्वसूचना न देता गेट वे आॅफ इंडिया ते मांडवा ही लाँच सेवा अचानक महागली आणि त्याचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागला. ही दरवाढ कमी करावी, अशी मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे.

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग तालुक्यातील मांडवादरम्यान दरवर्षी जवळपास १५ लाख प्रवासी या जलवाहतूक सेवेचा लाभ घेत असतात. या सेवेचे महत्त्व अलिबाग, रोहा आणि मुरूड तालुक्यांसाठी मोठे आहे. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी पूर्वी १४५ ते १९५ रु पयांचा दर आकारला जात होता. यात २० रु पये प्रवासी कर आणि ५ रु पये सुरक्षा कराचा समावेश होता. मात्र आता या जलवाहतुकीसाठी १६५ ते २१५ रु पये मोजावे लागणार आहेत. तिकीट दरात १५ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर मुंबईहून एलिफंटा बेटावर जाणाऱ्या डिलक्स बोटींच्या दरात १५ ते २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.अचानक झालेल्या दरवाढीमुळे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मत्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांना लेखी स्वरूपातील पत्र लिहून सागरी प्रवासातील वाढलेले प्रवासी भाडे कमी करण्याची विनंती केली आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम या फेरी बोट चालविणाºया कंपन्यांचा करत आहेत. ही सागरी दरवाढ कमी करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी दळवी यांनी केली आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग