शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग : सांबर कुंड धरणाबाबत उद्या मंत्रालयात बैठक, शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार सकारात्मक

By राजेश भोस्तेकर | Updated: October 31, 2022 13:47 IST

गेली अनेक वर्ष रखडलेल्या सांबर कुंड धरणाच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे.

राजेश भोस्तेकर

अलिबाग : गेली अनेक वर्ष रखडलेल्या सांबर कुंड धरणाच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. वन विभागाच्या अखत्यारीत रखडलेल्या प्रस्ताव बाबत मंत्रालयात वन मंत्री याच्याकडे १ नोव्हेंबर रोजी बैठक घेतली जाणार आहे. बैठकीनंतर राज्य शासनाकडे आलेला प्रस्ताव तातडीने दिल्लीला घेऊन जाण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. त्यामुळे सांबर कुंड धरण उभारणी दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अलिबाग तालुक्यातील अनेक वर्ष रखडलेल्या सांबर कुंड धरणाबाबत पालकमंत्री उदय सामंत याच्याकडे पत्रकारांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात सांबर कुंड प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांबर कुंड धरण बाबत रखडलेल्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न शासनाचा राहील असे पालकमंत्री सामंत यांनी म्हटले आहे. आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. 

अलिबाग तालुक्यातील रामराज महान भागात सांबर कुंड धरण प्रस्तावित आहे. गेली साठ वर्षापासून हे धरण प्रलंबित आहे. त्यामुळे धरण कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. धरणासाठी साडे चारशे एकर जमीन भुसंपदीत केली जाणार आहे. शेतकऱ्यांनीही धरण हवे आहे. मात्र वन विभागाची मंजुरी रखडल्याने आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हे अत्यल्प असल्याने धरण काम रखडले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र काम पुढे सरकले नाही. 

उदय सामंत यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सांबरकुंड धरण काम मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वन विभागाच्या परवानगी साठी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला असून केंद्राकडे पाठविला जाणार आहे. अशी माहिती कार्यकारी अभियता संजय जाधव यांनी पालकमंत्री यांना दिली. पालकमंत्री यांनी १ नोव्हेंबर रोजी वन मंत्री यांच्याकडे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू आणि प्रस्ताव त्वरित दिल्लीला घेऊन जा अशा सूचना अधिकारी याना दिल्या आहेत. शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सकारात्मक विचारधरणात शेतकऱ्याच्या जमिनी जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हा अत्यल्प असल्याने तो घेतला गेला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी केल्या आहेत.

तर धरणाचा खर्च हजार कोटींवर जाईल....२००१ साली सांबर कुंड धरणाचे काम ५० कोटी मध्ये होणार होते. मात्र काम रखडल्याने आता २०२२ साली या धरणाचा बांधकाम खर्च साडे सातशे कोटींवर पोहचला आहे. दोन वर्ष अजून काम रखडले तर  खर्च एक हजार कोटींवर जाईल अशी चिंताही पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे सांबर कुंड धरणाचे काम हे लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत