शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेसची जादू हवेत विरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 10:59 PM

पारडे सेनेकडेच झुकलेले : सुनील तटकरेंच्या मताधिक्याची आकडेवारी कमी

- आविष्कार देसाई।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय धुरिणांकडून ठामपणे दावे केले जात होते. मात्र, असे असतानाच शेकापच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडीच्या विजयी उमेदवाराला अपेक्षित मते मिळाली नाहीत. गत लोकसभा निवडणुकीपेक्षही सुनील तटकरेंच्या मताधिक्याची आकडेवारी कमी झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांना निवडून आणण्याचा चंग बांधला होता; परंतु प्रत्यक्षात मात्र शेकापची जादू तटकरेंच्या विजयाला विशेष कारणीभूत ठरली नसल्याचे निकालावरून दिसून येते. श्रीवर्धन मतदारसंघानेच त्यांना सर्वाधिक मताधिक्य दिल्याने शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना धूळ चारण्यात ते यशस्वी होऊ शकले. तटकरे यांना निवडून देण्याच्या शेकाप आणि काँग्रेसच्या वल्गना म्हणजे फुसका बार ठरल्या आहेत, त्यामुळे विजयाचे श्रेय हे फक्त श्रीवर्धन मतदारसंघाला देणे उचित ठरणार आहे.अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये तटकरे यांना ९९ हजार ४६३ आणि गीते यांना ७९ हजार ४९७ मते मिळाली. फक्त १९ हजार ९६६ मताधिक्य तटकरेंना मिळू शकले. २०१४ च्या निवडणुकीत शेकाप तटकरे यांच्या विरोधात लढली होती. त्यांनी रमेश कदम यांना स्वतंत्र उमेदवारी दिली होती. कदम यांना त्या वेळी एक लाख २९ हजार मते मिळाली होती. याचा विचार करता शेकापची रायगड लोकसभा मतदारसंघात किती ताकद होती हे स्पष्ट झाले होते. त्याचप्रमाणे शेकापचे आमदार सुभाष पाटील यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सुमारे ७५ हजार मते मिळाली होती आणि काँग्रेसचे उमेदवार मधुकर ठाकूर यांना सुमारे ४५ हजार मते मिळाली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीमध्ये सामील झाले होते, त्यामुळे तटकरे यांची ताकद निश्चितच वाढली होती. तटकरे हे सुमारे ८० हजारांहून अधिक मताधिक्य मिळवून निवडून येणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. २०१४ साली अलिबाग मतदारसंघात २० हजार ४१ मतांची आघाडी मिळाली होती. आताच्या निवडणुकीत १९ हजार ९६६ म्हणजे गेल्या निवडणुकीच्या मताधिक्याच्या तुलनेत फक्त ७५ मते अधिक आहेत. याचाच अर्थ शेकाप आणि काँग्रेसची जादू चालली नाही हेच आकड्यांवरून स्पष्ट होते.

शेकाप आणि काँग्रेस हे आघाडीत सामील झाल्यामुळे परस्पर पक्षातील कार्यकर्ते नाराज झाले होते. गेली कित्येक दशके काँग्रेस आणि शेकाप हे पारंरपरिक कट्टर विरोधक राहिले आहेत. पक्षासाठी कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी तर फोडलीच आहेत, शिवाय रोटी-बेटी व्यवहारही त्यांच्यात होत नव्हता. तटकरे यांच्या जाहीरसभांमधून काँग्रेसचे माजी आमदार मधूकर ठाकूर आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील हे मांडीला-मांडी लावून बसल्याचे चित्र कार्यकर्त्यांना रुचले नाही. चालून आलेली ही संधी शिवसेनेने सोडली नसती तर नवलच म्हणायचे. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचा विरोध मतदान यंत्रातून दाखवून दिला होता, हे आता निकालावरून स्पष्ट होत आहे. कारण अलिबाग विधानसभा मतदारसंघातून तटकरे यांना ४० हजारांहून अधिक मताधिक्य देणार असल्याचे शेकापनेते सांगत होते. मात्र, प्रत्यक्ष मतदान यंत्र उघडल्यावर वेगळेच बाहेर आले.

२०१४ साली तटकरे यांच्या सोबत असणारे महेंद्र दळवी हे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेसोबत होते. दळवी यांनी २०१४ साली तटकरे यांना केलेली मदतवजा करून त्या जागी शेकापने मदत केली हे मान्य केले तरी शेकाप तटकरे यांना अलिबागमध्ये म्हणावे तसे मताधिक्य देऊ शकले नाही एवढे मात्र सत्य आहे.विधानसभेसाठी शेकाप-राष्ट्रवादी एकत्र?२०१९ च्या निकालावरून आगामी होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना युतीला रोखण्यासाठी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढू शकतात. मात्र, काँग्रेसला आघाडीत कितपत सामावून घेतील यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. अलिबाग विधानसभा काँग्रेस लढत आलेली आहे, त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर अथवा त्यांच्या घरातील अन्य उमेदवारासाठी हट्ट धरला जाणार हे लपलेले नाही.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचा आमदार येथून निवडून गेलेला आहे, त्यामुळे शेकाप हक्क सोडणार नाही. शेकाप अलिबाग, पेण, पनवेल आणि उरणवर हक्क सांगू शकतो, तर कर्जत आणि श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेसकडे कारण त्यांचे तेथे आमदार आहेत. महाड विधानसभा काँग्रेस लढत आली आहे, त्यामुळे तो त्यांच्याकडे राहू शकतो. प्रत्यक्षात हे आघाडी होणे आणि न होणे यावरच अवलंबून राहणार आहे.की फॅक्टरकाय ठरला?२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडीमध्ये सामील झाले होते; त्यामुळे सुनील तटकरे यांची ताकद वाढली.

टॅग्स :raigad-pcरायगड