शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग मतदारसंघात महिला मतदारांचे मत ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 00:39 IST

पुरुषांपेक्षा महिला अधिक; २०१४ च्या तुलनेमध्ये १० हजार ६७२ ने वाढ; एकूण दोन लाख ९३ हजार ९६२ मतदार

अलिबाग : विधानसभा मतदारसंघामध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवाराला आमदार बनवण्याची ताकद त्यांच्याकडेच असल्याने उमेदवारांचे लक्ष साहजिकच महिला मतदारांवर राहणार आहे.२०१४ सालच्या तुलनेमध्ये २०१९ मध्ये महिला मतदारांचे प्रमाण हे १० हजार ६७२ ने वाढले आहे, तर पुरुष मतदारांचे प्रमाण हे सातहजार ३५० ने अधिक असल्याचे दिसून येते. अलिबाग विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख ९३ हजार ९६२ मतदार आहेत. यात अलिबाग तालुक्यातील दोन लाख सहा हजार ९०७, मुरु ड तालुक्यातील ६३ हजार ४६७ तर रोहा तालुक्यातील २३ हजार ५८८ मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघात पुरु षांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण अधिक आहे. एक लाख ४५ हजार ९१९ पुरु ष तर एक लाख ४८ हजार ४३ महिला मतदार आहेत.२०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत एक लाख ३८ हजार ५६९ पुरुष मतदार होते, तर एक लाख ३७ हजार ३७१ महिला मतदार होत्या. यामध्ये २०१९ मध्ये महिला मतदारांच्या संख्येमध्ये १० हजार ६७२ तर पुरुष मतदारांच्या संख्येत सात हजार ३५० ने वाढ झाली आहे. त्यामुळे महिला मतदारांचे प्रमाण अधिक असल्याने त्याच अलिबागचा आमदार ठरवण्याची क्षमता ठेवून आहेत.विधानसभा निवडणूक शांततेत, भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदारसंघात एकूण ३७१ मतदान केंद्र असल्याची माहिती अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.अलिबागमध्ये चार मतदान केंद्राचे विभाजन करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. यात अलिबाग तालुक्यातील एक तर रोहा तालुक्यातील तीन मतदान केंद्रांचा समावेश आहे. सारसोली केंद्राचे विभाजन करून टिटवी हे नवीन केंद्र सुरू केले जाणार आहे. सूडकोली केंद्राचे विभाजन करून म्हसाडी केंद्र सुरू केले जाणार आहे.गायचोळ केंद्राचे विभाजन करून खांबेरे मतदान कें द्र सुरू करण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यातील रुइशेत केंद्राचे विभाजन करून भोमोली हे केंद्र सुरू केले जाणार आहे. या प्रस्तावास निवडणूक आयोगाने मान्यता दिली तर चारही केंद्रांवर यंदा मतदान प्रक्रिया पार पडेल, असे पोवार यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019