शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्यातील भडकलेल्या महागाई विरोधात जागतिक महिला दिनीच उरणमध्ये महिलांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 18:22 IST

उरणच्या गांधी चौकात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भडकलेल्या महागाई विरोधात निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मधुकर ठाकूर -

उरण : केंद्र व राज्यातील भडकलेल्या महागाई विरोधात  रायगड जिल्हा अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने बुधवारी (८)  उरणच्या गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. जागतिक महिला दिनीच निदर्शनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. 

 उरणच्या गांधी चौकात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भडकलेल्या महागाई विरोधात निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या निदर्शन कार्यक्रमातुन हेमलता पाटील यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. महागाई वाढविणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कारही करण्यात आला. तर ३५० रुपये किंमतीच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर १ हजार १५० रुपयांवर पोहचला आहे.या महागाईमुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. राज्यातील सरकारकडूनही या वाढत्या महागाईकडे दुर्लक्षच केले जात आहे.केवल पोकळ व फसव्या जाहिराती करून हे सरकार आपली पाठ थोपटून घेत असल्याचा आरोपही  हेमलता पाटील यांनी केली.    तर रायगड जिल्हा अध्यक्ष अमिता ठाकूर यांनी महिला दिन हा संघर्ष व त्यागाचा दिवस असून तो करमणुकीचा दिवस होता कामा नये. महिलांचे प्रश्न व त्यांच्यावरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याचे स्पष्ट करून महिलांनी आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. तसेच जेष्ठ महिला कार्यकर्त्या कुसुम ठाकूर,चंपा पाटील,आशा वर्कर संघटनेच्या रसिका घरत व किसान सभेचे सचिव संजय ठाकूर यांचीही यावेळी भाषणे झाली. 

टॅग्स :WomenमहिलाInflationमहागाई