शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विरोधानंतरही उरणातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यासाठी सिडकोची पुन्हा अधिसूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 20:30 IST

संतप्त शेतकऱ्यांनी निषेध करुन हरकती नोंदविण्यासाठी ४ जानेवारीला सिडको भवनावर धडक देण्याचा निर्णय

मधुकर ठाकूर, उरण: तालुक्यातील चाणजे, नागाव, केगाव, बोकडवीरा, पागोटे व फुंडे येथील गावातील  शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनासाठी सिडकोने विकासाच्या नावाखाली पुन्हा एकदा सुधारित अधिसूचना काढली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही सिडकोच्या या अधिसूचनेमुळे मात्र पुन्हा संतापाची लाट उसळली आहे .शेतकऱ्यांच्या तातडीने सोमवारी (२५) बोलाविण्यात बैठकीत ४ जानेवारी रोजी सिडको भवनावर हरकती व निषेध नोंदविण्यासाठी आंदोलनाची तयारी सुरू करण्यात आहे.

उरण तालुक्यातील चाणजे, नागाव, केगाव, बोकडवीरा, पागोटे व फुंडे येथील गावात स्वातंत्र्यपूर्वी  पासूनच नागरिकांची वस्ती आहे.मालकीची शेती आहे.सिडको विकासाच्या नावाखाली तालुक्यातील या गावातील शेतकऱ्यांचा जमिनी संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.यासाठी सिडकोने जमिनी संपादित करण्यासाठी अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे. १२ ऑक्टोबर २०२२ काढण्यात आलेल्या अधिसूचनेनंतर येथील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सिडकोच्या अधिसूचनेला यापूर्वीच निषेध , हरकती नोंदवून कडाडून विरोध केला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतर सिडकोने पुन्हा एकदा उरण तालुक्यातील चाणजे, नागाव, केगाव, बोकडवीरा, पागोटे व फुंडे येथील गावातील १३२७ सर्व्हे नंबरमधील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनासाठी  सुधारित अधिसूचना काढली आहे.२२ डिसेंबर रोजी काढलेल्या अधिसूचनेनंतर परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.संतप्त झालेल्या शेतकऱ्यांची सोमवारी (२५) सिडको प्रकल्पग्रस्त घर व जमीन बचाव समितीच्या नेतृत्वाखाली तातडीने बैठक बोलविण्यात आली होती.या बैठकीला समितीचे पदाधिकारी भुषण पाटील, सुधाकर पाटील, संतोष पवार, काका पाटील, अरविंद घरत, महेश म्हात्रे, चेतन गायकवाड, मधुसूदन म्हात्रे, ॲड.दिपक ठाकूर आणि शेतकरी उपस्थित होते.

या बैठकीत विरोध असतानाही शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याच्या सिडकोच्या अधिसुचनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.सिडकोच्या या संपादन प्रक्रियेत विरोधात पुन्हा एकदा हरकती नोंदविण्यासाठी ४ जानेवारी रोजी सिडको भवनावर धडक देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे संतोष पवार यांनी दिली.

सिडकोला द्रोणागिरी नोडमध्ये साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटपासाठी जमीन कमी पडत आहे. त्यासाठी चाणजे, नागाव- केगाव आणि इतर गावांतील जमिनी नव्याने संपादित करण्यासाठी अधिसूचना काढली आहे. परंतु राहती घरे असताना जमिनी संपादित केल्या जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकरी आणि घर मालकांनी या भूसंपादनाला बैठकीत तीव्र विरोध दर्शविला आहे.

टॅग्स :cidcoसिडको