शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणेला जाग, गावोगावी सर्व्हेला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 19:20 IST

पुढील २० दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

मधुकर ठाकूर, उरण: उरणमध्ये दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या सुट्यांमध्ये सहल, फिरण्याच्या निमित्ताने बाहेर जाऊन आलेल्यांमुळे कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या २० दिवसांपर्यंत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन उरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे यांनी केले आहे.

उरण तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने परिसरातील गावागावात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. तसेच समाजमाध्यमाव्दारे पोस्टर आणि बॅनरव्दारे सुचना देऊन जनजागृती केली जात आहे.जेएन- १ हा कोरोना व्हेरियंट तितकासा प्रभावी नसला तरी त्याचा मात्र संसर्गाचा प्रभाव अधिक आहे.सर्दी व ताप अशी या नव्याने आलेल्या कोरोनाची लक्षणे आहेत.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही उरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र ईटकरे यांनी आरोग्य विभागाच्या वतीने केले आहे.

कोरोनाची तपासणी करण्याची व्यवस्था उरण शहरातील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. तर पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालय व कामोठे येथील रुग्णालयात कोरोनाबाधीत रुग्णांना दाखल करून उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.सध्या सुट्टी, सणासुदीमुळे सहली , पिकनिक आदी मौजमजा लुटण्यासाठी हजारो नागरिक बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्या परतण्यामुळे कोरोनाच्या रुग्णांत वाढ होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पुढील १५-२० दिवस नागरिकांनी दक्षता घेण्याची आणि सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र ईटकरे यांनी आवाहन केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या