शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातबंदीनंतर जेएनपीए बंदरात सात हजार टन कांद्याचे अडकून पडलेले २५० कंटेनर रवाना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 19:45 IST

याबाबतची माहिती सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  

मधुकर ठाकूर, उरण : चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यात खुली करण्याच्या केंद्र सरकारच्या आदेशानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे तीन दिवसांपासून जेएनपीए बंदरात अडकून पडलेला सुमारे २५० कंटेनरमधील सात हजार टन कांदा अखेर मंगळवारी (७) संध्याकाळपासून रवाना होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  

ऐन लोकसभा निवडणुकीतच शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी नंतर तब्बल १५० दिवसांनी ४० टक्के निर्यात शुल्काची अट कायम ठेऊन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे.यासाठी ३ मे रोजी केंद्र सरकारने अध्यादेशही काढला.मात्र अध्यादेश ७ मेच्या  संध्याकाळपर्यंत सीमा शुल्क विभागाच्या वेबसाइटवर अपडेटच झालाच नाही. यामुळे जेएनपीए बंदरातुन निर्यातीसाठी पाठविण्यात आलेले कांद्याचे सुमारे २५० कंटेनर बंदर परिसरातील ठिकठिकाणच्या सीएफएस तीन दिवसांपासून अडकून पडले होते. सुमारे सात हजार टन कांदा बंदरातच अडकून पडल्याने वेळेत कांदा निर्यात होऊ शकला नाही. परिणामी झालेल्या विलंबामुळे जहाजाचे भाडे व इतर खर्चही वाढल्याचा जबरदस्त फटका शेकडो कांदा निर्यातदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसला.   केंद्र सरकारच्या ४० टक्के निर्यात शुल्क भरून कांदा निर्यातबंदी उठवून कांदा निर्यात खुली केली आहे.मात्र या निर्यात शुल्कामुळे कांद्याची मागणी कमी होणार आहे.परिणामी कांद्याची निर्यातही कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी आणि कांदा निर्यात बंदी उठविण्याच्या राजकीय खेळामुळे मात्र कांदा निर्यातदार, व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे निर्यातदार व्यापारी राहुल पवार यांनी सांगितले.  

जेएनपीए आणि सीमा शुल्क विभागाची वेबसाईट तांत्रिक अडचणींमुळे अपडेट होण्यास विलंब झाल्यानेच निर्यातीसाठी पाठविण्यात आलेला सुमारे सात हजार टन कांद्याचे २५० कंटेनर बंदरातच अडकून पडले होते.मात्र ७ मे संध्याकाळपर्यंत वेबसाईट सुरू झाली आणि कांदा निर्यातीचे कामही सुरळीतपणे सुरू झाले असल्याची माहिती न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण