शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जप्तीच्या आदेशानंतर सिडको नरमली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 03:24 IST

निवाडे झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही टाळाटाळ करणा-या मेट्रो सेंटर विरोधात जप्तीचा बडगा उगारताच सिडकोने सुमारे १७ कोटींची रक्कम जमा केली आहे.

उरण : निवाडे झालेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही टाळाटाळ करणा-या मेट्रो सेंटर विरोधात जप्तीचा बडगा उगारताच सिडकोने सुमारे १७ कोटींची रक्कम जमा केली आहे. शेतक-यांच्या वाढीव मोबदल्याची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली असून, न्यायालयामार्फत शेतक-यांना मोबदल्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली.उरण तालुक्यातील २८ गावांतील शेतकºयांची आणि मिठागरांची मिळून सुमारे सात हजार हेक्टर जमिनीचे क्षेत्र सिडकोने संपादित केले आहे. कवडीमोल भावात संपादित केलेल्या जमिनीला जादा भाव वाढवून देण्याच्या मागणीसाठी अनेक शेतकºयांनी न्यायालयात दावे दाखल केले होते. न्यायालयानेही शेतकºयांच्या बाजूने निकाल देताना १९७०मध्ये संपादन केलेल्या जमिनीला १३ रुपये प्रति चौ. मी. तर १९८६मध्ये संपादन करण्यात आलेल्या जमिनीसाठी विविध प्रक रणात २०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढीव मोबदला देण्याचे आदेश विविध निवाडा प्रकरणी न्यायालयाने दिले होते. मात्र, अनेक शेतकºयांना वाढीव मोबदला देण्यास सिडकोने चालढकल केली. या विरोधात शेतकºयांनी पुन्हा न्यायालयात धाव घेताच उरण मेट्रो सेंटरच्या कार्यालयीन सामानाच्या जप्तीची कारवाई करण्याचे आदेश आले होते. जप्तीच्या आदेशानंतर सिडकोने शेतकºयांना वाढीव मोबदल्यापोटी १७ कोटींची रक्कम उरण मेट्रो सेंटरच्या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. वर्ग करण्यात आलेली रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली आहे. न्यायालयामार्फतच शेतकºयांना वाढीव मोबदल्याची रक्कम अदा केली जाणार असल्याची माहिती उरण मेट्रो सेंटरच्या उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील यांनी दिली.

टॅग्स :cidcoसिडको