शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तब्बल ७५ वर्षांपासून अंधारात असलेली हुतात्मा नाग्या कातकरी प्रकाशाने उजळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 19:09 IST

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत वीजेचे पोल काढून जप्त करून अधिकाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली होती.

मधुकर ठाकूर

उरण : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तब्बल ७५ वर्षांपासून अंधारात असलेली हुतात्मा नाग्या कातकरी यांची चिरनेरमधील ३० कुटुंबांची चांदायली आदिवासीवाडी शनिवारी (३०) प्रकाशमान झाली असल्याची माहिती उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवले यांनी दिली. चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील हुतात्मा नाग्या कातकरी यांची चांदायली आदिवासी वाडीतील ३० कुटुंब ७५ वर्षांपासून अंधारात चाचपडत होती. चांदायली आदिवासी वाडीपर्यंत वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. वीजेचे पोलही टाकण्यात आले होते. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत वीजेचे पोल काढून जप्त करून अधिकाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली होती. तसेच दंडात्मक कारवाईपोटी वीजमंडळाला २० हजार रुपये दंड भरावा लागला.त्यानंतर मात्र वनविभागाची परवानगी घेऊन काम करण्यात आले असल्याची माहिती सोनवले यांनी दिली. 

त्याचबरोबर चिरनेर ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर मोकल,उपसरपंच सचिन घबाडी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी कार्यकर्ते अमर कातकरी, राजू कातकरी, भरत कातकरी ,यशवंत कातकरी, महेंद्र कातकरी, जयवंत कातकरी, सुधीर कातकरी यांनीही वीज पुरवठा करण्यासाठी उरण वीज महामंडळाचे मुख्य अभियंता विजय  सोनवले यांच्याकडे  सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर सर्वच अडथळे दूर करून चांदायली आदिवासी वाडी पर्यंत ६ लाख ७५ रुपये खर्च करून २१ वीजेचे पोल टाकण्यात आले आहेत.पोल टाकण्यात आल्यानंतर शनिवारी (३०) संध्याकाळपासून चांदायली आदिवासी वाडीवर वीजपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती उरण महावितरणचे उप अभियंता विजय सोनवले यांनी दिली. चांदायली आदिवासी वाडी ७५ वर्षांनंतर प्रकाशाने पहिल्यांदाच उजळली निघाली आहे. त्यामुळे  येथील आदिवासींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Raigadरायगडuran-acउरण