शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांनी वधूवरांच्या पदरात पडला ‌‘आहेर; १५८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा

By निखिल म्हात्रे | Updated: February 10, 2024 16:11 IST

आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे ४००हून अधिक प्रस्ताव अनुदानाअभावी रखडले होते.

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे ४००हून अधिक प्रस्ताव अनुदानाअभावी रखडले होते. आता सरकारने एक कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दिले आहेत. त्यापैकी 192 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, 158 लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे.

लग्न झाल्यानंतर लगेच वधूवरांना आहेर देण्याची प्रथा सर्वमान्य आहे. मात्र, या ठिकाणी सरकारचा आहेर हा चार वर्षांनी वधूवरांच्या पदरात पडला आहे. मागील काही शिल्लक प्रस्ताव आणि नव्याने आलेल्या सुमारे 200हून अधिक प्रस्तावांसाठी तब्बल दोन कोटी रुपयांच्या निधीची चणचण प्रशासनाला भासत आहे. त्यानुसार सरकारकडे नव्याने अनुदानाच्या रकमेची मागणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातींपैकी एक व्यक्ती आणि दुसरी व्यक्ती सवर्ण म्हणजे हिंदू, जैन, लिंगायत, शिख या धर्मातील असल्यास आंतरजातीय विवाह म्हणून अनुदानास पात्र ठरविण्यात येते. यासाठी राज्य सरकारने 30 जानेवारी 1999 च्या शासन निर्णयाद्वारे या योजनेच्या आर्थिक सहाय्यतेमध्ये वाढ करून 15 हजार रुपये देण्याचे सुरू केले. गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा, उत्तर प्रदेश, चंडीगड आदी राज्यांत अशा जोडप्यांना 50 हजारांपर्यंत अनुदान दिले जाते. याच धर्तीवर महाराष्ट्रातही एक फेब्रुवारी 2010 पासून आंतरजातीय विवाहांसाठीचे अर्थसाहाय्य वाढवून 50 हजार करण्यात आले आहे. त्यानंतर या योजनेसाठी केंद्रीय समाजकल्याण विभागाने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सध्याच्या केंद्र सरकारने ही योजना नव्याने कार्यान्वित करून ‌‘डॉ. आंबेडकर स्कीम फॉर सोशल इंटिग्रेशन थ्रू इंटरकास्ट मॅरेज’ असे नाव देत या योजनेंतर्गत अनुदानात वाढ केली आहे. या माध्यमातून 2019 पासून रायगड जिल्हा परिषदेकडे 403 प्रस्ताव आले. मात्र, अपुऱ्या निधीअभावी त्यांचे अनुदान रखडले होते.

या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा अनुक्रमे 50 टक्के आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून येणारा निधी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे वर्ग करण्यात येतो. त्यानंतर अनुदानाची रक्कम संबंधित जोडप्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. जिल्हास्तरावर 2018 मध्ये केंद्र सरकारचा निधी उपलब्ध झाला होता, तर राज्याचा निधी खोळंबला होता. 2019 मध्ये राज्याचा निधी आला, तर केंद्र सरकारचा निधी उपलब्ध झाला नाही. असा घोळ गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरु आहे. त्यानंतर 2021-22 पासून निधीच आला नसल्याने अनुदानाचे वाटप झाले नव्हते.

आता सरकारने एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच, काही आधीचे प्रस्ताव आणि नव्याने आलेल्या सुमारे 200 हून अधिक प्रस्तावांना दोन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.- शाम कदम, समाज कल्याण विभाग, रायगड जिल्हा परिषद

टॅग्स :marriageलग्न