शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आई होऊन पोलिसांनी दिले बालकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 00:37 IST

जन्मदात्रीने टाकले कचऱ्यात : उपचारानंतर बाळाजी प्रकृती स्थिर; वात्सल्य ट्रस्टकडे सोपविले

निखिल म्हात्रे।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : खाकी वर्दी गुन्हेगारीला आळा बसवते, तर सामान्यांना दिलासा देते, हे अनेक वेळा अनेक प्रसंगातून समोर आले आहे. पोलिसांनी देवदूताच्या रूपात येऊन अनेकांचे प्राण वाचवले आहेत, अशीच एक घटना रसायनीत घडली. पोलिसांनी मायेचा हात ठेऊन आई बनून नवजात बालकाला नवे जीवन दिले आहे.१ सप्टेंबरला रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कचरा साठवणूक केलेल्या मैदानावर अर्भकाला कोणीतरी फेकून दिले होते. नुकत्याच जन्म झालेल्या बालकाला कचºयात टाकून जन्मदात्री निघून गेली होती. हे अर्भक पुरुष जातीचे असून, याबाबत रसायनी पोलिसांना एका महिलेने माहिती दिली होती. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भकाला ताब्यात घेऊन रात्री साडेबाराच्या सुमारास जिल्हा सामान्य रु ग्णालयात दाखल केले. हे नवजात बालक कमी वजनाचे व कमी दिवसाचे होते. रु ग्णालयात आणले, तेव्हा त्याला धाप लागली होती आणि पोटात रक्तस्त्राव झाला होता. त्याचे वजन १ किलो ८२० ग्रॅम होते.बालकाला रुग्णालयात आणल्यानंतर तातडीने त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. औषधोपचार करून बाळाला सुस्थितीत केले. आता त्या बाळाची प्रकृती उत्तम असून, त्याचे वजन आता १ किलो ९२० ग्रॅम झाले आहे.डॉक्टर आणि परिचारिकांनी बाळाची उत्तम काळजी घेतल्याने आज हे बालक जग पाहतोय. त्यामुळे बाळाला आता अलिबाग येथील वात्सल्य ट्रस्टकडे सोपविण्यात आले आहे. रसायनी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार डी. जी. देडे, पी. आर. जंगम यांनी २२ दिवस या बालकाचीरु ग्णालयात राहून काळजी घेतली.जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई यांनी डॉक्टरांना मार्गदर्शन केले. बालरोगतज्ज्ञ डॉ.एम. एस. क्षीरसागर, डॉ.आशिष पाटील, डॉ.मंजुश्री शिंदे, डॉ.सागर खेदु, डॉ.प्रीतम वरसोलकर, डॉ.पोटे, परिचारिका यांनी मुलाची काळजी घेऊन नवीन जीवन दिले आहे.

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसी