शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
3
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
4
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
5
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
6
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
7
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
8
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
9
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
11
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
12
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
13
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
14
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
15
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
16
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
17
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
18
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
19
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
20
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २९ तासांनंतर ओसरले कुंडलिका नदीचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:02 IST

वाहतूक सुरळीत : रोह्यात जनजीवन पूर्वपदावर

रोहा : रोह्याच्या कुंडलिकेला आलेल्या पुराचे पाणी तब्बल २९ तासांनंतर ओसरले. निसर्गाच्या प्रकोपाचा आणि लहरी वृत्तीचा रोहेकरांना यंदा हा वेगळा अनुभव आला आहे. या कालावधीत बंद राहिलेली वाहतूक रविवारी पहाटे पूर्ववत सुरू झाली. रोहा अष्टमीकरांसह तालुक्यातील इतर भागातील नागरिक, प्रवासी, कामगार आणि विद्यार्थ्यांचे विस्कळीत झालेली जनजीवन सुरुळीत झाले आहे.

गेले काही दिवस जोरदार कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कुंडलिका नदीला शुक्रवारी मध्यरात्री पूर आला. नदीच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आणि पुराचे पाणि रोहा शहरातील दमखाडी, अष्टमी, वरसे आणि रोठ खुर्द गावांत शिरले. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मध्यरात्री तीन वाजल्यापासून पुलावरून अडीच ते तीन फूट पाणी वाहत होते. पुलावरूनही पाणी जाऊ लागल्याने रोहा पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद ठेवली होती. अष्टमीकडील गावांतून धाटाव एमआयडीसीमध्ये दुसºया पाळीसाठी आलेल्या कामगारांना काही कंपन्यांनी पाण्याची पातळी वाढल्याचे समजताच रात्री लवकर सोडले. गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे भिरा व डोलवाहळ धरणातून पाणी सोडण्यात येण्याची भिती व्यक्त होत होती. नदीच्या पाण्याची वाढलेली पातळी रात्री उशिरापर्यंत ओसरली नसल्याचे पाहून सखल भागात राहणाºया नागरिकांत थोडे भितीचे वातावरण होते. त्यामुळे नागरिक सतत नदीच्या पातळीकडे लक्ष ठेवून होते. मध्यरात्रीनंतर पावसाने अधून मधून थोडी विश्रांती घेतली, रविवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान वाढलेली पाणी पातळी ओसरली. त्यामुळे २९ तास इतका कालावधी पुराचे पाणी रोहा अष्टमीत राहण्याची ही पहिली घटना होती. निसर्गाच्या प्रकोपाचा आणि लहरी वृत्तीचा यंदा हा वेगळा अनुभव रोहेकरांना आला आहे. पाणी ओसारल्याने अष्टमीकडील अनेक गावांतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.च्सतत कोसळणाºया पवसाचा फटका अष्टमी नाका आदी ठिकाणच्या लोकांना बसला असला तरी अष्टमी मराठा आळी येथील प्रेमा मारूती खैरे यांचे घर या पावसामुळे कोसळल्याने सरकारी यंत्रणेने पंचनामा करून मदत करवी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Raigadरायगड