शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

ग्रा.पं. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, पंचायत समितीत अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 01:04 IST

elections : उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज महा-ई-सेवा केंद्र अथवा अन्य संगणकीय यंत्रणेद्वारे भरून त्याची प्रत काढून घ्यावी व नंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून परिपूर्ण अर्ज दाखल करायचा आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान सुट्टीचे दिवस वगळून दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत पनवेलच्या पंचायत समितीत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजीव मांडे यांनी दिली.उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज महा-ई-सेवा केंद्र अथवा अन्य संगणकीय यंत्रणेद्वारे भरून त्याची प्रत काढून घ्यावी व नंतर त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून परिपूर्ण अर्ज दाखल करायचा आहे. सर्व २४ ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी २४ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ऑनलाइन उमेदवारी अर्ज २४ तास भरता येणार आहे. या अर्जासोबत ग्रामपंचायत थकबाकी नसल्याचा दाखला, उमेदवार ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याचा, ग्रामसेवक यांचा दाखला, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र अथवा शौचालय वापराबाबत ग्रामसभेच्या ठरावासह प्रमाणपत्र, अपत्यांचे घोषणपत्र, (१२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य नसावे), निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक पासबुक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चालेल, अनामत रक्कम भरल्याची पावती, मालमत्ता व दायित्व घोषणा पत्र, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसल्याबाबत घोषणा पत्र, जात वैधता प्रमाण पत्र किंवा जात पडताळणीसाठी प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती असे दाखले, प्रमाणपत्र जोडून त्यावर आवश्यक तेथे सह्या करून सदर परिपूर्ण उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करावयाचा आहे.

१५ जानेवारीला मतदान शुक्रवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत आवश्यक असेल तेथे मतदान घेण्यात येणार आहे. सोमवार, १८ जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :panvelपनवेलElectionनिवडणूक