शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

९९ टक्के शाळा, अंगणवाड्यांना पुरेसे पिण्याचे पाणी

By निखिल म्हात्रे | Updated: April 5, 2024 15:37 IST

‘जलजीवन मिशन’नुसार जिल्ह्या २५० पेक्षा अधिक योजना पूर्ण

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : जलजीवन मिशन कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील ९९ टक्के शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत शाळांमधील मतदान केंद्रांनाही यामुळे पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात ‘हर घर नल - हर घर जल अभियान’ राबवण्यात येत आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत जलजीवन मिशनच्या २५० पेक्षा अधिक योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर, उर्वरित प्रगतिपथावर आहेत. या योजनेअंतर्गत गावे वाड्यांबरोबर तेथील शाळांनाही पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांबरोबरच शाळांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते आहे. पाणी नसल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच स्वच्छतागृहांचीही गंभीर समस्या निर्माण झाली होती. शौचालयांचा वापर करता येत नव्हता. ही समस्या निकाली काढण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन योजनेतील पाण्याची जोडणी शाळांनाही देण्यात आली. त्यामुळे ज्या शाळांमध्ये पाणीसमस्या भेडसावत होती, ती निकाली निघाली आहे. जिल्ह्यातील ३ हजार १५५ शाळा आणि ३ हजार ५१ अंगणवाड्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. आता शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी तर उपलब्ध झाले असून, स्वच्छतागृहाचा वापर करणे सहज शक्य झाले.मतदारांनाही सुविधा -

रायगड लोकसभा मतदार संघासाठी येत्या ८ मे रोजी मतदान होत आहे. जिल्ह्यात २ हजार ६९४ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. बहुतांश केंद्रे ही शाळांमध्येच आहेत. या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान केंद्रांवर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह अशा सुविधा पुरवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास सर्व शाळांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. निवडणुकीच्या काळात हा मोठा दिलासा मानला जात आहे.जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ९९ टक्क्यांपेक्षा अधिक शाळा आणि अंगणवाड्यांना नळजोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. केवळ ३ शाळा आणि २ अंगणवाड्यांचे पाणी पुरवठ्याचे काम शिल्लक आहे. ते एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल. - संजय वेंगुर्लेकर, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :alibaugअलिबाग