शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आदिशक्तीचा आजपासून जागर; कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:08 IST

अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, बुधवारी जिल्ह्यात तीन हजार ५४६ ठिकाणी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अलिबाग : अश्विन शुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून, बुधवारी जिल्ह्यात तीन हजार ५४६ ठिकाणी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात एक हजार १०८ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांत, तर खासगी १७८ दुर्गादेवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पांरपरिक घटस्थापना होणार असून, त्यात १८३ सार्वजनिक, तर एक हजार ७८३ खासगी घटांचा समावेश आहे. २०० सार्वजनिक, तर ९४ खासगी ठिकाणी देवींच्या फोटोंची स्थापना करण्यात येणार आहे.दहा दिवसांच्या नवरात्रोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याकरिता नियमित पोलीस बंदोबस्तासह जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. माणगाव व खालापूर या दोन ठिकाणी आरसीपी प्लाटून, तर पेण येथे एसआरपी प्लाटून राखीव सज्ज ठेवण्यात आली आहेत. ३०० पुरु ष व १०० महिला होमगार्ड सज्ज ठेवण्यात आले आहेत.नवरात्रोत्सवासाठी चौल-रेवदंडा सज्जरेवदंडा : शारदीय नवरात्रोत्सवासाठी चौल-रेवदंडा परिसर सज्ज झाला असून, अनेक मंडळे मोठे मंडप, आकर्षक विद्युत रोषणाई, नयनरम्य आरास, फुलांची सजावट, रांगोळीची नक्षी त्यात विराजमान होण्यासाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते तयारीत दिसत आहेत. साखरचौथचे गणपती विसर्जन झाल्यावर आबालवृद्धाचे लक्ष शारदीय नवरात्र उत्सवाकडे लागलेले असते. ती प्रतीक्षा संपून आता हवा असणाऱ्या शारदीय उत्सवाचा दिवस आल्याने देवीच्या स्वागतात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी मंडळाचे कार्यकर्ते सज्ज दिसत आहेत. उद्यापासून परिसर गजबजणार असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज आहे.कोटेश्वरी मंदिरातनवरात्र उत्सवाची तयारीआगरदांडा : मुुुरुड-जंजिरा शहरात पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत कोटेश्वरी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात दरवर्षी मोठी गर्दी होते. मंदिर परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उत्सवात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म सकाळपासून सुरू असणार आहेत.१ हजार ३७६ विसर्जन मिरवणुकादरम्यान, नवरात्रोत्सवांती १८ ते २१ आॅक्टोबर असे चार दिवस जिल्ह्यात एक हजार ३७६ विसर्जन मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये १८ आॅक्टोबर रोजी ७०१ सार्वजनिक, तर १६३ खासगी देवी मूर्तींच्या मिरवणुका आहेत. १९ आॅक्टोबर रोजी ४२७ सार्वजनिक, तर ७३ खासगी, २० आॅक्टोबर रोजी ११ सार्वजनिक आणि २१ आॅक्टोबर रोजी सात सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका होणार आहेत.

टॅग्स :Raigadरायगड