शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल विधानसभा मतदारसंघात बहुजन वंचित आघाडी सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:54 IST

शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा जोर; पारंपरिक मते विभागण्याची भीती

- वैभव गायकर पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघात युती आणि आघाडी अशी थेट लढत पाहावयास मिळत आहे. आघाडीमार्फत पार्थ पवार तर युतीच्या माध्यमातून श्रीरंग बारणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभांना राज्यातील दिग्गज नेते हजेरी लावत आहेत. मात्र, आता पनवेलमध्ये बहुजन वंचित आघाडीने प्रचारात जोर धरला आहे.बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील यांनी पनवेल ग्रामीण भागासह प्रचाराला सुरुवात केली आहे. एकट्या पनवेलमध्ये एकूण साडेपाच लाख मतदार आहे. पनवेल, उरण दोन्ही मतदारसंघात एकूण साडे आठ लाखांच्या आसपास मतदार आहेत. त्यामुळे या दोन मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पनवेलमध्ये सभा झाल्या. बहुजन वंचित आघाडीनेही आता पनवेलमध्ये जोरदार प्रचाराला सुरुवात केल्याने मागासवर्गीय व मुस्लीम मतदारांचा कल बहुजन वंचित आघाडीकडे वळू शकतो. विशेष म्हणजे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील हे आगरी समाजाचे असल्याने आगरी समाजाची सहानुभूती म्हणून त्यांना आगरी समाजाची मते पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी बहुजन वंचित आघाडीला पसंती दिल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात आघाडीला बहुजन वंचित आघाडीचा फटका बसण्याची शक्यता आहे.२७ एप्रिल रोजी उरणमध्ये बहुजन वंचित आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला खासदार असुद्दीन ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. सध्या मावळमध्ये आघाडीचे उमेदवार पार्थ पवार व युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता दिसून येत असली तरी बहुजन वंचित आघाडीची मते या दोघांपैकी एकाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणार हे मात्र नक्की आहे. मावळ, पिंपरी चिंचवडसारख्या घाटमाथ्यावर बहुजन वंचित आघाडीने जोरदार प्रचार केल्यानंतर शेवटच्या टप्प्यात पनवेल, उरण व खालापूरमध्ये जोरदार प्रचाराची रणनीती बहुजन वंचित आघाडीने आखली आहे.उरणमध्ये ओवेसीची सभाउरणमध्ये बहुजन वंचित आघाडीची शनिवारी २७ एप्रिल रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेला खासदार असुद्दीन ओवेसी आणि बाळासाहेब आंबेडकर उपस्थित राहणार असल्याने या सभेमुळे बहुजन वंचित आघाडीकडे मुस्लीम व मागासवर्गीय मतदारांचा कल वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी