शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:48 IST

रायगड जिल्ह्यामध्ये सध्या बोगस डॉक्टरांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. रुग्णांच्या आयुष्याशी खेळणा-या या नराधमांचा बीमोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. बोगस डॉक्टरांचा छडा लावण्यासाठी तालुकास्तरावर पथके तैनात करण्यात आली आहेत. कोणतीही पदवी न घेता तसेच सक्षम यंत्रणेची परवानगी न घेता प्र्रॅक्टिस करणा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने बोगस डॉक्टरांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये सध्या बोगस डॉक्टरांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. रुग्णांच्या आयुष्याशी खेळणा-या या नराधमांचा बीमोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. बोगस डॉक्टरांचा छडा लावण्यासाठी तालुकास्तरावर पथके तैनात करण्यात आली आहेत. कोणतीही पदवी न घेता तसेच सक्षम यंत्रणेची परवानगी न घेता प्र्रॅक्टिस करणा-यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने बोगस डॉक्टरांचे मात्र धाबे दणाणले आहेत.रायगड जिल्ह्यामध्ये विकासाचे वारे वाहत असल्याने नागरीकरणामध्येही वाढ होत आहे. कामगार, मजूर, कष्टकरी अशा व्यक्तींना रोजच्या जीवनामध्ये आरोग्याचे प्रश्न उद्भवतात. त्या वेळी त्यांना दवाखान्यामध्ये जावे लागते. अशा ठिकाणी बोगस डॉक्टरांचे प्रमाण अधिक असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. बोगस डॉक्टर अशा व्यक्तींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्यावर थातूरमातूर उपचार करीत असल्याच्या घटना घडत आहेत. तज्ज्ञ अथवा वैद्यकीय पदवी घेतलेल्या डॉक्टरांकडून उपचार घेतले जात नसल्याने संबंधिताच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. काही प्रकरणामध्ये तर, रुग्णांची स्थिती गंभीर झाल्याच्या तक्रारीही जिल्हा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांकडे झाल्या होत्या. बोगस डॉक्टर रुग्णांकडून पैसे उकळून त्यांचे आरोग्यही धोक्यात घालत असल्याने अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई होणे गरजेचे होते.जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल फुटाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई उपस्थित होते. रुग्णांच्या आयुष्याशी खेळणाºया बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी दिले. जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालुकास्तरावरील आरोग्य अधिकारी अध्यक्ष असलेल्या समिती, नगरपालिका क्षेत्रामध्ये मुख्याधिकारी आणि पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आयुक्त यांनी मरगळ झटकून कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्याच्या ठिकाणी असणाºया बोगस डॉक्टरांची कुंडली तयार करून ती जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या समितीकडे सोपवायची जबाबदारी तालुकास्तरीय समितीला देण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत संबंधित पोलीस ठाण्याकडे तक्रार करून बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील आयएमए, आरएमए आयुर्वेदिक वैद्यकीय व्यावसायिक संघटना, होमीओपॅथी वैद्यकीय व्यावसायिक संघटना यांचीही मदत घेण्यात यावी, असेही निर्देश सूर्यवंशी यांनी दिले.

टॅग्स :doctorडॉक्टरRaigadरायगड