शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 04:45 IST

नेरळ ग्रामपंचायतीचा निर्णय : पदपथावरील दुकाने हटवणार

नेरळ : शहरात अनधिकृत पार्किं ग वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून नेरळ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच यांनी नेरळ शहरातील मुख्य रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केल्यास कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळ ग्रामपंचायत आणि पोलिसांकडून ही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई सोमवार, ७ जानेवारी पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने पार्क करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नेरळ ग्रामपंचायतीने शहरात फलक लावून केले आहे.

नेरळमध्ये मोठ्या प्रमाणात नगरीकीकरण होत आहे. मात्र, शहरात कोणत्याही प्रकारे पार्किंग व्यवस्था नसल्याने मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत दुचाकी तसेच चारचाकी वाहने रस्त्यावर अनधिकृतपणे पार्क केल्या जातात, त्यामुळे दररोज शहरात वाहतूककोंडी होते. या वाहतूककोंडीवर नेरळ ग्रामपंचायत आणि वाहतूक पोलिसांचे नियंत्रण नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. बुधवारला आठवडाबाजार भरत असल्याने चालण्यासही जागा नसते. बाजारपेठेतून टॅक्सी, रिक्षा, मालवाहतूक करणारे टेम्पो अशी मोठी वाहने येत असल्याने कोंडीत आणखी भर पडते. अनधिकृत वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने दिवसा व रात्री वाहने पार्क केली असल्यास नेरळ ग्रामपंचायतीमार्फत कार्यवाही म्हणून स्टिकर लावून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.च्नेरळ आणि परिसरातील दिवसेन्दिवस लोकसंख्या वाढत आहे. या ठिकाणी अनेक मोठे गृहप्रकल्प उभे राहत असल्याने वर्दळ वाढली आहे. तुलनेने रस्ते छोटे पडत आहेत. शिवाय, पार्र्किं गसाठीही योग्य सुविधा नसल्याने नागरिक रस्त्यावर वाहने उभी करतात, त्यामुळे वाहतूककोंडी होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने अवैधपार्किं गविरोधात मोहीम सुरू केली आहे.नवनिर्वाचित सरपंच यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे; परंतु ही कारवाई कायमस्वरूपी असणार का? की फक्त आठवडाभरापुरती, याअगोदर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली होती; परंतु चार दिवसांतच ही कारवाई थंडावली आणि पुन्हा नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला, तसेच फुटपाथवर बसणाºयावरही कारवाई करावी, यामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.- सुमित क्षीरसागर, स्थानिक, नागरिकवाहनचालकांवरफौजदारी गुन्हे

च्नेरळ शहरात नियम मोडणाºया वाहनचालक यांच्यावर फौजदारी गुन्हाही नोंदविण्यात येणार आहे. नेरळ ग्रामपंचायतीकडून या निर्णयाचे स्वागत होत असले तरी ही कारवाई किती दिवस चालणार, हा खरा प्रश्न आहे.च्मागील काही महिन्यांपूर्वीही अशीच कारवाई ग्रामपंचायतीकडून करण्यात आली होती; परंतु आठवडाभरातच ही कारवाई थंडावल्याने परिस्थिती जैसे थेच झाली आहे.च्तसेच नेरळ बाजारपेठेतील फुटपाथवर बसलेल्या भाजी-विक्रे त्यांवरही कारवाई करून त्यांना नेरळ व्यापारी संकुल येथे बसण्यास सांगितले होते; परंतु पुन्हा भाजी विक्रे त्यांनी आपले बस्तान पदपथावर थाटले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग