शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पेण अर्बनच्या ५१.८ कोटींच्या वसुलीसाठी कृती दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 03:04 IST

पेण अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी ठेवींचा परतावा करण्यासाठी, दोषी व्यक्ती व तत्कालीन संचालकांच्या जप्त करावयाच्या मालमत्ता लवकरात लवकर अधिसूचित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिले.

- जयंत धुळप अलिबाग : पेण अर्बन बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी ठेवींचा परतावा करण्यासाठी, दोषी व्यक्ती व तत्कालीन संचालकांच्या जप्त करावयाच्या मालमत्ता लवकरात लवकर अधिसूचित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी आयोजित बैठकीत दिले. दरम्यान, ५० हजार रुपयांच्या वरच्या रकमेची ७८७ कर्जखात्यांमधील ५१ कोटी ८ लाख रुपयांची वसुली करण्यासाठी बँकेच्याच ५० कर्मचाऱ्यांचे कृती दल स्थापन करण्यात आले असल्याचीही माहिती बैठकीत देण्यात आली.दी पेण को-आॅप. अर्बन बँक लि. या बँकेच्या गैरव्यवहारप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कृती समितीची बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती. मात्र, ही बैठक सुरू होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. अखेर विशेष कृती समितीचे दिवंगत सदस्य बंधू साखरे यांना श्रद्धांजली अर्पण करून आम्ही जिल्हा प्रशासन आणि शासनाचा निषेध करून सभागृहातून निघून गेलो, अशी माहिती पेण को-आॅप. अर्बन बँक विशेष कृती समितीचे सदस्य नरेन जाधव यांनी दिली. त्यानंतर दुपारी २ वाजता पेण अर्बनच्या विशेष कृती समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी नरेन जाधव यांच्यासह कोणीही अशासकीय सदस्य उपस्थित नव्हते. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, रिझर्व्ह बँकेचे व्यवस्थापक सी.एस. जुवेकर, जिल्हा उपनिबंधक पी.एम. खोडका, जिल्हा विशेष लेखा परीक्षक यू. जी. तुपे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत राजे, वसुली अधिकारी काशिनाथ गावंड, सक्त संचालनालयाचे उपसंचालक प्रकाश जाधव, पोलीस उपधीक्षक (गृह) विजय पांढरपट्टे, तपास अधिकारी धनाजी क्षीरसागर, सह निबंधक पेण बी.के. हांडे, सनदी लेखापाल व्ही.एस. वैद्य उपस्थित होते.>मालमत्ता जप्तीसाठी नियुक्तीची सूचनादरम्यान, सक्त संचालनालय, पोलीस व सीबीआय यांनी केलेल्या कारवाईत १२८ बोगस कर्जखात्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी ४५ कोटी ८३ लाख रु पयांची वसुली झाली असून १४७ मालमत्ता अधिसूचित करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत पोलीस तपास यंत्रणेमार्फत गैरव्यवहारांतील मालमत्तांचा शोध घेऊन त्या मालमत्ता जप्त करण्याबाबत सक्षम प्राधिकाºयांनी अधिसूचना लवकरात लवकर जारी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी बैठकीत केली.>२,९६६ शिल्लक कर्जखात्यांची वसुली सुरूबँकेने ३१ जुलै २०१८ अखेर १६७ कोटी ७८ लाख रु पयांची कर्ज वसुली केली असून, एकूण ७ हजार ९७० कर्जखात्यांपैकी पाच हजार कर्जखाती बंद करण्यात आली आहेत. सद्यस्थितीत २ हजार ९६६ कर्जखाती शिल्लक असून त्यांच्याकडून वसुलीची कारवाई सुरू आहे. त्यात ५० हजार रु पयांच्या वरच्या रकमेची ७८७ कर्जखात्यांमधील ५१ कोटी ८ लाख रु पयांची वसुली करण्यासाठी बँकेच्याच ५० कर्मचाºयांचे कृती दल गठीत करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.>६६ कोटी ३२ लाखांची रक्कम ठेवीदारांना परतमुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी व अपहृत रकमेच्या वसुलीसाठी विशेष कृती समिती गठीत करण्यात आली आहे. बँकेत झालेल्या ७५८ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी सद्यस्थितीत १ लाख ७१ हजार ३६९ ठेवीदारांच्या ६१४ कोटी ५० लाख रकमेच्या ठेवी परत करावयाच्या आहेत. आतापर्यंत बँकेने केवळ ६६ कोटी ३२ लाखांची रक्कम ठेवीदारांना परत केल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

टॅग्स :MONEYपैसा