शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
3
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
4
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
7
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
8
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
9
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
10
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
11
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
12
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
13
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
14
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
15
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
16
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
17
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
18
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
19
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
20
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

वर्षभरात १,८७३ वाहनचालकांचे परवाने निलंबित, पनवेल परिवहन विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 01:58 IST

प्रादेशिक परिवहन विभागाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी ही कारवाई केली आहे.

पनवेल : वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या १,८७३ वाहनचालकांचे परवाने पनवेल परिवहन विभागातर्फे निलंबित करण्यात आले आहेत. २०१९ ही कारवाई करण्यात आली आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.प्रादेशिक परिवहन विभागाच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी ही कारवाई केली आहे. मागील वर्षाच्या १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या आठ महिन्यांच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी, ट्रक, रिक्षा, टेम्पो, मालवाहू वाहन चालकांचा समावेश आहे. वाहतुकीच्या नियमांबाबत परिवहन विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते, तरीसुद्धा वाहनचालक वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत सर्रास हे नियम पायदळी तुडवत असतात. अशा वाहनचालकांविरोधात हे सक्त पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली. यामध्ये मद्यपान करून वाहन चालवणे, ओव्हर स्पिडिंग, गाडी चालविताना मोबाइलवर बोलणे या प्रामुख्याने कारणांचा समावेश आहे. प्राथमिक स्वरूपात वाहन परवाने ९० दिवस निलंबित केले जातात. मात्र, वारंवार या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप तरी एकही परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला नसल्याचे पाटील याची स्पष्ट केले.मागील वर्षी २०१८ मध्ये २,८९० परवाने रद्द करण्यात आले होते. तर २०१७ मध्ये ही संख्या ४०२ एवढी होती. पनवेल परिवहन कार्यालयाची व्याप्ती वाढत आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अंतर्गत पनवेल, उरण, खालापूर आणि कर्जत या शहरांचा समावेश आहे, त्यामुळे दिवसागणिक वाहनांच्या संख्येत मोठ्या संख्येने भर पडत आहे.वाहचालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, याकरिता ही कारवाई करण्यात आली आहे. १,८७३ वाहनचालकांचे परवाने केवळ ९० दिवसांपुरते निलंबित आहेत. याच नियमांचे उल्लंघन केल्यास या वाहनचालकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात येतील.- हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

टॅग्स :Raigadरायगड