शहरं
Join us  
Trending Stories
1
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
2
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
3
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
4
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
5
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
6
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 
7
"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
9
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
10
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
11
इक्विटी फंड गुंतवणुकीला ब्रेक; या ईटीएफमध्ये पैसा ओततायत लोक, तुम्ही...
12
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
13
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
14
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
15
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
16
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
17
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
18
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
19
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
20
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."

वर्षभरात एक लाख चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:41 IST

पळस्पे पोलीस मदत केंद्रातील अधिकाऱ्यांनी कसली कंबर 

मयूर तांबडेलोकमत न्यूज नेटवर्कनवीन पनवेल : महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे मार्फत २०२०मध्ये १ लाख ६ हजार २४ वाहनचालकांवर चलनादवारे कारवाई करण्यात आली आहे. विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणा-या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्रातील अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे.अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांच्या आदेशाप्रमाणे चालकांचे प्रबोधन व बेशिस्त चालकांवर कारवाई अशी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सन २०२० मध्ये इंटरसेप्टर वाहनादूवारे व मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वेगवेगळया ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामार्फत अतिवेगाने वाहन चालविणा-या ४१ हजार ७३८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. व सीट बेल्ट न लावणे, मोबाईल संभाषण, लेन कटींग, काळया काचा, रिफलेक्टर नसलेल्या वाहनांवर तसेच इतर मो.वा.का.कलमाअंतर्गत ६४ हजार २८६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.राज्यातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता डॉ. भुषणकुमार उपाध्याय अपर पोलीस महासंचालक वाहतुक महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्या सुचनांप्रमाणे सुनिता साळुंखे - ठाकरे, पोलीस अधीक्षक (मुख्यालय) व डॉ.दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र ठाणे, संजय बारकुंड पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस रायगड परिक्षेत्र, सुदाम पाचोरकर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सपोनि सुभाष पुजारी, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होणा-या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले आहे. अधिकारी व अंमलदारांकडून करण्यात येणा-या कारवाई तसेच वाहन चालकांच्या प्रबोधनामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्राणांतीक अपघातामध्ये सन२०२० मध्ये सन २०१९ पेक्षा ४० टक्के पेक्षा अपघात कमी झालेले दिसुन येत आहेत.

वाहतूक नियमांबाबत जनजागृती कोरोना संसर्ग काळामध्ये काळात महामार्ग केंद्राच्या वतीने महामार्ग पोलीस अंमलदारांना तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलातील कर्मचारी व देवदुत कर्मचारी आणि वाहनचालकांना सॅनीयायझर्स, मास्क शिल्ड, यांचे वाटप करण्यात आले. महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे कडुन अपघात कमी व्हावे तसेच वाहनचालकांमध्ये वाहतुक नियम व नियमनाबाबत जनजागृती व्हावी याकरीता वेळोवेळी चौक सभा आयोजीत करुन टोलनाका येथे कार्यकम घेवुन वाहतुक नियमांबाबतच्या माहितीबाबतची एका वर्षात ७५०००पत्रके वाटली. 

वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणा-या दंडात्म्क कारवाईबाबतची माहीती देवुन वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते.- सुभाष पुजारी, सहा. पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे