शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बेदरकार वाहन चालकांवर डिजिटल चलनाद्वारे कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:58 IST

रायगडमध्ये ‘एक राज्य एक ई-चलान’ योजना

अलिबाग : महाराष्ट्र राज्यात मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना कारवाईमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व वाहन चालकांवर डिजिटल चलनाद्वारे कारवाई करण्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये सोमवारपासून ‘एक राज्य एक ई-चलान’ ही योजना राबविण्यात आली आहे.

या आधुनिक कार्यप्रणालीअंतर्गत शासनाकडून दिलेले डिव्हाईस हे अ‍ॅन्ड्रॉईड मोबाइलसारखे असून त्यास ब्लूटूथद्वारे कनेक्ट करण्यासाठी प्रिंटर दिलेला आहे. ही ई-चलन कार्यप्रणाली पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्या अधिपत्याखाली वाहतूक विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष राबवीत आहेत.

शासनाकडून प्राप्त असलेल्या माहितीनुसार दिलेल्या डिव्हाईसमध्ये नवीन व वेगवेगळे मोबाइल अ‍ॅप्स अद्ययावत करण्यात आलेले असून एखाद्या वाहन चालकाने महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी मोटार वाहन कायद्याचा भंग केल्यास व तो वाहन चालक दुसऱ्या ठिकाणी सापडल्यास,त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक अधिकारी वा कर्मचाऱ्याने त्याचा वाहन नंबर अ‍ॅप्समध्ये टाकल्यास त्या वाहनाने यापूर्वी मोटार वाहन कायद्याचा भंग केलेल्या सर्व नियमांचा तडजोड तपशील त्या वाहतूक अधिकारी वा कर्मचाºयास दिसेल. त्यावेळी त्या वाहन चालकाला त्याने यापूर्वी भंग केलेल्या नियमांच्या तडजोड शुल्काची रक्कम भरण्यास तो बांधील राहील. तसेच वाहन चालकाने चारचाकी वाहनाचा नंबर हा दुचाकी वाहनास दिला असल्यास तसा संदेश लगेच डिव्हाईसवर दिसणार आहे.

या कार्यप्रणालीमध्ये तडजोड शुल्काची रक्कम ही वाहन चालकास महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी रोख स्वरूपात तसेच एटीएम कार्ड स्वाइप करून तसेच आॅनलाइन पेमेंटद्वारे भरता येणार आहे. कारवाईदरम्यान कसुरदार वाहन चालकास मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या नियमाचा भंग केला आहे. त्याचा व त्याबाबत तडजोड शुल्क भरल्याचा संदेश (एसएमएस) वाहन चालकाच्या मोबाइलवर दिसणार आहे. तसेच त्याची वाहन चालकाने पावती मागितल्यास त्यास पावती देखील मिळणार आहे.