शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात ‘गुरुजी’ दिसल्यास कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 23:40 IST

निवडणूक आयोगाचा दणका । सभा, प्रचार, प्रचारफेरीत दिसल्यास गमवावी लागणार नोकरी

विनोद भोईर ।लोकमत न्यूज नेटवर्कपाली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कडक निर्बंध घातले आहेत, यानुसार कोणत्याही प्रचारसभेत किंवा प्रचारफेरीत शिक्षक दिसल्यास, त्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे. अगदी खासगी शिक्षण संस्थांनाही याबाबत आदेश देण्यात आले आहेत.जिल्हा निवडणूक आयोगाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस गुरुजींना सभेत, प्रचारफेºया सुरू असलेल्या मार्गाचा अवलंबही टाळावा लागणार आहे. निवडणूक म्हटले की साम-दाम-दंड-भेद अशा सर्व शक्तींचा वापर होतो. राजकीय पक्ष आपल्या पक्षांशी संलग्न असलेल्या सर्व संघटना दावणीला बांधतात.मागील निवडणुकांचा आढावा घेतल्यास, ज्या राजकीय मंडळींच्या शिक्षण संस्था आहेत, तेथील शिक्षकांना प्रचारासाठी पाठविले जाते. त्यांच्यावर सभा, प्रचारफेरी, व्यवस्थापन अशा जबाबदाºया सोपविल्या जातात. मात्र, आता ते शक्य होणार नाही आणि चुकून एखादा शिक्षक प्रचार, सभेत आढळल्यास त्याला नोकरी गमवावी लागेल, शिवाय उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रारही दाखल होऊ शकते.निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, अलीकडे प्रचारसभा, बैठका, प्रचारफेरी यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातात. अशा चित्रीकरणात शिक्षक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकारणात वावरणाºया शिक्षकांवर आता टाच येणार आहे. हा नियम शासकीय-निमशासकीय खासगी शिक्षकांनाही लागू करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.प्रचारसभा, बैठकांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. अशा चित्रीकरणात शिक्षक आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाºयांना देण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकारणात वावरणाºया शिक्षकांवर टाच येणार आहे.

टॅग्स :alibag-acअलिबागAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019