शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पर्यटकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:28 IST

माथेरान नगरपरिषद, अश्वपाल संघटनांचा पुढाकार

कर्जत : थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये वर्षभर लाखो पर्यटक येतात. शहराच्या प्रवेशद्वारापासूनच दररोज पर्यटकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, पर्यटकांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका या वेळी घेण्यात आली आहे.

माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी पर्यटकांची फसवणूक थांबविण्यासाठी ‘मी माथेरानकर’ म्हणून सोशल मीडियावर माथेरानचे पर्यटन वाचविण्याकरिता नागरिकांनाच आवाहन केले आहे, तर स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घोड्यावर बसलेल्या पर्यटकांनाच थेट आपल्याकडून किती पैसे घेतले? अशी विचारपूस करत जास्त पैसे उकळणाºया अश्वचालकांचे व्हिडीओ चित्रीकरण करत सोशल मीडियावर प्रसारित करून पोलिसांना दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करा, असे आवाहन केले आहे.

येणाऱ्या पर्यटकांची फसवणूक करून जास्त पैसे उकळणाºया घोडेवाल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नगरपरिषदेने एक आराखडा तयार केला आहे. त्यात काही नियम-अटींचा समावेश केला असून सदर तो जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीकरिता पाठवली आहे. त्याला मान्यता मिळताच येथील पर्यटनला बाधा आणणाऱ्या दोषींवर कडक केली जाईल. - प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान नगरपरिषद

माथेरान ही आमची जन्मभूमी बरोबर कर्मभूमी आहे. येथील बहुतांश लोकांचे जीवन पर्यटनावर अवलंबून आहे. ठरावीक लोक माथेरानमध्ये उदरनिर्वाहाच्या नावाखाली राजरोसपणे पर्यटकांची फसवणूक करत आहेत. यामुळे येथील पर्यटन धोक्यात आले आहे. अशा व्यक्तींना संघटना पाठीशी घालणार नाही व दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. - आशा कदम, अध्यक्षा, स्थानिक अश्वपाल संघटना

टॅग्स :Matheranमाथेरान