शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

चुकीचे, खोटे पंचनामे केल्यास कारवाई; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 04:21 IST

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

रायगड : खोटे अथवा चुकीचे पंचनामे करुन कोणी मदत लाटण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनला गुरुवारी १०० दिवस पूर्ण होत आहेत. तसेच निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. निसर्ग वादळात घरांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे. त्यातील ७६ टक्के नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरीत मदत लवकरच देण्यात येईल. काही ठिकाणी सात बारावर अधिक नावे असणे, बँकेतील खाते नंबर चूकीचा असणे अशा काही तांत्रीक चुकांमुळे मदत मिळण्यास अडचण येत आहे. मात्र नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. मासेमारी बोटींचे, जाळ्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी निधीची गरज असल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

कोरोनाचा धोका वाढत आहे. प्रशासनाने तीन हजार खाटांचे नियोजन केले आहे. १०० दिवस नागरिकांनी साथ दिली आता पुढील १०० दिवस कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे, तरच आपण कोरोना विरोधातील युध्द जिंकू असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.कोरोनामुळे लॉकडाऊन हा उपाय नाही

  • लॉकडाऊन आणि कंपनी बंद करणे हा कायमस्वरुपी उपाय नाही. त्यामुळे लॉकडाऊन करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जेएसडब्ल्यू, सुदर्शन दिपक फटीर्लायझर, रिलायन्स अशा विविध कंपन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यासाठी त्या कंपन्यांच बंद करणे योग्य ठरणार नाही.
  • तसे केले तर कोरोनामुळे कमी आणि भूकमारीने जास्त मृत्यू होतील असेही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी किमान दोन खाटा राखून ठेवाव्यात. त्याचे बिल महात्मा फुले जन आरोग्य अभियान योजनेतून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होणारमाणगाव, म्हसळा, रोहा आणि श्रीवर्धन तालुक्यातील १९० गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत. ५ जुलैपर्यंत माणगाव, म्हसळा, रोहा तर श्रीवर्धन तालुक्यात १२ जुलैपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस