शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीच्या खाडीपात्रातील रेतीमाफियांवर मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 20:53 IST

रायगड-रत्नागिरीच्या सीमेवरील धडक कारवाईनं माफियांचे धाबे दणाणले

रायगड : सावित्री नदीच्या समुद्राकडील खाडीपात्रात म्हाप्रळ-आंबेत परिसरात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर चोरट्या मार्गानं बंद स्थितीत उभे असलेले चार सक्शन पंप पाण्यात बुडवण्यात आले. तर एक सक्शन पंप म्हसळा तहसील कार्यालयानं जप्त केला. महसूल विभागाच्या विशेष पथकाच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.रत्नागिरी जिल्हा खनिकर्म अधिकारी मिनाक्षी माने, दापोली उपविभागीय महसूल अधिकारी जयराम देशपांडे यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैधरित्या पंप लावून वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मंडणगड तहसीलदार प्रशांत पानवेकर, म्हसळा तहसीलदार जयराज सुर्यवंशी, मंडणगड पोलीस निरीक्षक उत्तम पिठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.के. जाधव, महसूल कार्यालयातील पथकाचे श्याम जवळगे, विनोद पारधे यांचे पथक बोटीच्या मदतीने पाण्यात गस्त घालण्यासाठी नदीपात्रात उतरलेले होते. यावेळी केलेल्या कारवाईत म्हाप्रळ आंबेत परिसरात रायगड जिल्ह्याचे सीमेवर चार संक्शन पंप बांधून ठेवल्याचे आढळून आले. ते बोटीने नदीपात्राबाहेर काढणे शक्य नसल्यानं पाण्यात बुडवण्यात आले. तर एक मोकळा असलेला सक्शन पंप जप्त करून खाजगी बोटीनं किनारी आणून म्हसळा तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई दरम्यान अवैध वाळू साठ्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये दोन ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी साठेबाज नाहीर मांडलेकर याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.गुरुवारी दुपारी साडेचार वाजता गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सक्शन पंप चालक व मालक यांनी शासनाची परवानगी नसताना आंबेत हद्दीतील सावित्री बाणकोट खाडीमध्ये अवैधरित्या वाळू उत्खनन करून रेती चोरण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी  एक लोखंडी सक्शन पंप व बोट असा एकूण चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी गोरेगाव पोलीसांनी भा.द.वि.कलम 379,511, महाराष्ट जमीन महसूल अधिनियम 1966  चे कलम 48 अन्वये गुन्हा केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.  

टॅग्स :Raigadरायगड