शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूरमध्ये अपघात; दोन गाड्यांची समोरासमोर धडक, एक जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 00:04 IST

अतिवेगात, बेदरकारपणे चालवून पोलादपूर बाजूकडून येणाऱ्या  प्रवीण मोरे यांच्या  व्हॅगनर गाडीच्या रॉंग साईटला जाऊन समोरून धडक दिली.  

पोलादपूर : विनापास प्रवासाला परवानगी मिळाल्यानंतर महामार्गावर वाहनाची संख्या वाढल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. १४ ऑक्टोबर रोजी मुंबई गोवा महामार्गावरील पोलादपूर हद्दीतील मौजे भोगाव गावच्या जवळ इनोव्हा कार व मारुती व्हॅगनार यांच्यात सामोरा समोर धडक होऊन अपघात झाला. यात व्हॅगनार चालक किरकोळ जखमी झाला. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

१४ ऑक्टोबर  रोजी  प्रवीण राजाराम मोरे (रा. कातळी बंगला ता. पोलादपूर) हे त्यांच्या ताब्यातील व्हॅगनार गाडी क्रमांक एम.एच. ०६-ए.एस. ६७२५ ही मुंबई-गोवा महामार्गावर महाड ते कातळी बंगला, पळचील (ता. पोलादपूर) अशी स्वत: चालवित घेऊन जात असताना कशेडी घाट, मौजे भोगाव गावचे हद्दीत आल्यावेळी रत्नागिरी बाजूकडून येणारी ईनोव्हा गाडी क्रमांक एम.एच. ०३ - ऐ.आर. ८६२० वरील चालकाने मौजे भोगाव गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर  पोलादपूर येथे आल्यानंतर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन अतिवेगात, बेदरकारपणे चालवून पोलादपूर बाजूकडून येणाऱ्या  प्रवीण मोरे यांच्या  व्हॅगनर गाडीच्या रॉंग साईटला जाऊन समोरून धडक दिली.  अपघातामध्ये मोरे किरकोळ जखमी झाले. याबाबत पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पो.ना. मोरे हे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात