शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, ट्रॅव्हलर बसची ट्रेलरला धडक; चालकासह १४ प्रवासी जखमी

By राजेश भोस्तेकर | Updated: September 8, 2022 08:12 IST

मुंबई गोवा महामार्गावर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बसने ट्रेलरला धडक दिली.

अलिबाग :

मुंबई गोवा महामार्गावर पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हलर बसने ट्रेलरला धडक दिली. या अपघातात चालकासह 14 प्रवासी जखमी झाले. यात 7 महिलांचा समावेश आहे. अपघात ग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांनी तातडीने जखमींना पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले  अपघातग्रस्त बस 22 प्रवासी घेवून रत्नागिरीतील खेड येथून मुंबईकडे निघाली होती. पेण जवळील हमरापूर फाटा इथं पुलावर नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या कॉईल वाहक ट्रेलरला बसने मागून धडक दिली. अपघातात बसच्या पुढील भागाचे नुकसान झालंय.

गणेशोत्सव साजरा करून चाकरमानी हे मुंबईकडे येऊ लागले आहेत. अपघातग्रस्त वाहन ही कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करत होते. टेम्पो ट्रॅव्हलर (एम एच ४३ बीपी ०७५६ ) खेडवरून मुंबई सांताक्रूझकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. पेण हमरापूर पुलावर ट्रॅव्हल्स आली असता बंद पडलेल्या कॉईल ट्रेलर (एम एच ४६ एआर ००७४) ला मागून धडक दिल्याने अपघात घडला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. गणेशोत्सव काळात महामार्गावर वाहनाची संख्या वाढली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडत आहेत. वेगाची मर्यादा चालक पाळत  नसल्याने अपघाताला कारण ठरत आहे. 

जखमींची नावे चालक सागर दिलीप गुरव वय ३१प्रतिभा महेश देवळे वय ३०रंजना दीपक भुवड वय २५मीनल काशिनाथ देवळे वय २५काशिनाथ पांडुरंग देवळे वय ५०सुरेश सखाराम नाचरे वय ४०प्रवीण काशिनाथ नाचरे वय ३४मंगेश मधुकर देवळे वय ४१स्वप्निला काशिनाथ देवळे वय ४७संजना संजय पाटील वय ३४समृद्धी संजय पाटील वय १४दीपक गंगाराम भुवड वय ३०श्वेता सुनील भुवड वय ३५संजना सुरेश नाचरे वय ३५

टॅग्स :Accidentअपघात