शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर एसटीला अपघात, प्रवासी बचावले, एक मुलगी किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 03:08 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी ३च्या सुमारास केंबुर्ली गाव हद्दीत ट्रेलरच्या हुलकावणीमुळे अर्नाळा-गुहागर ही एसटी रस्त्याच्या कडेला एका डिव्हाइडरवर आदळली. या अपघातामध्ये एसटीमधील एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाली.

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी ३च्या सुमारास केंबुर्ली गाव हद्दीत ट्रेलरच्या हुलकावणीमुळे अर्नाळा-गुहागर ही एसटी रस्त्याच्या कडेला एका डिव्हाइडरवर आदळली. या अपघातामध्ये एसटीमधील एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाली.अर्नाळा-गुहागर मुंबई, ठाण्यामधून सकाळी १०.१५ वाजता सुटणारी एसटी (एमएच २० बीएल १८५४) ही महाड तालुका हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गाव हद्दीत दुपारी ३च्या सुमारास आली. याच वेळी महाड ते मुंबई दिशेला जाणारा कंटेनर (एमएच ४६ /२७२५) याने एसटीला हुलकावणी दिली. यामुळे एसटी दुभाजकावर आपटून चिखलामध्ये फसली.एसटीमध्ये महाड, चिपळूण, गुहागर येथे जाणारे ३८ प्रवासी प्रवास करत होते. अपघातामध्ये एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती एसटी वाहक पी. एम. मगर यांनी दिली. अपघातानंतर कंटेनर चालक वाहन घेऊन त्या ठिकाणहून पसार झाला. एसटीचालक कळंबे यांनी दुसऱ्या वाहकाच्या साह्याने कंटेनरचा पाठलाग करत काही अंतरावर त्याला थांबवून महाड शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.अरुंद रस्त्यामुळे अपघातअपघाताच्या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर भागाचे खोदकाम झाले आहे. या पावसामुळे दोन वेळा महामार्गावर मातीचे ढिगारे आले. ठेकेदार कंपनीने या ठिकाणी आलेल्या मातीच्या ठिकाणी डिव्हायडर लावल्याने या ठिकाणी महामार्ग अरुंद झाला आहे. यामुळे अपघातांना निमंत्रण दिल्यासारखे हे ठिकाण झाले आहे.

टॅग्स :Accidentअपघात