शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कर्जतमधील पदरगड संवर्धन मोहिमेला गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:28 IST

Padargad Conservation Campaign : गणेश घाटाचा राखणदार अशी ओळख असणाऱ्या कर्जतमधील पदरगडच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमी एकवटले आहेत. रविवारी झालेल्या श्रमदान मोहिमेमध्ये विविध संस्थांमधील ५०पेेक्षा जास्त सदस्यांनी सहभाग घेतला होता.

नवी मुंबई - गणेश घाटाचा राखणदार अशी ओळख असणाऱ्या कर्जतमधील पदरगडच्या संवर्धनासाठी दुर्गप्रेमी एकवटले आहेत. रविवारी झालेल्या श्रमदान मोहिमेमध्ये विविध संस्थांमधील ५०पेेक्षा जास्त सदस्यांनी सहभाग घेतला होता. दिवसभरात गडावरील टाक्यामधील गाळ काढण्यात आला असून जवळपास ९० टक्के टाके गाळमुक्त करण्यात यश मिळविले आहे.मुंबई, ठाणे, नवी मुंबई मधील ट्रेकर्स व दुर्गप्रेमींसाठी कर्जत परिसर हा पर्वणी ठरत असतो. अनेकांच्या भटकंतीची सुरुवात या परिसरातील गड, किल्ल्यांपासून होत असते.  यापूर्वी भटकंतीसाठी येणारे दुर्गप्रेमी आता या गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठीही योगदान देऊ लागले आहेत. भावी पिढीपर्यंत हे ऐतिहासिक वैभव पोहोचविण्यासाठी सर्वप्रथम ते जपले पाहिजे या भूमिकेतून संवर्धन मोहिमांचे आयोजन केले जात आहे. सफर सह्याद्री ट्रेकर्स, भटके एडव्हेंचर, सह्याद्री संजीवनी परिवार, दुर्ग पंढरी सामाजिक संस्था व बाप्पा मोरया क्रिकेट संघ राजापूर व इतर संस्थांच्या सदस्यांनी एकत्र येऊन रविवारी तीसरी संवर्धन मोहीम आयोजित केली होती. ५० पेक्षा जास्त सदस्य या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. हा गाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले. जवळपास टाके गाळमुक्त झाले आहे. थोडा गाळ शिल्लक असून तो पुढील मोहिमेच्यावेळी काढला जाणार आहे. सूचना फलक लावलेपदर गडावर जाणाऱ्या मार्गावर नवीन पर्यटक रस्ता चुकू नयेत यासाठी सूचना फलक लावण्यात आले आहेत. यापुढेही संवर्धनाचे काम सुरू ठेवले जाणार आहे. या मोहिमांमध्ये रस्ता व्यवस्थित करणे व इतर कामे केली जाणार आहेत. गड संवर्धनाच्या कामात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दुर्गप्रेमींनी केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड