शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

पोलादपूरमध्ये शेतीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 01:02 IST

जूनमध्ये गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस : मान्सून वेळेत दाखल झाल्याने बळीराजा सुखावला

पोलादपूर : यंदा चांगला पाऊस होणार असल्याच्या हवामान विभागाच्या अंदाजाचे समाधान शेतकरी राजा व्यक्त करत असून, शेतीच्या कामांनी वेग घेतल्याचे चित्र महाड आणि पोलादपूर तालुक्यातील गावागावांत दिसून येत आहे. गतवर्षी १७ जून, २०१९ रोजी पोलादपूरमध्ये ३ मिमी पावसाची नोंद झाली होती. या वर्षी ७ मिमी पावसाची नोंद झाल्याचे सांगण्यात आले.गेल्या दोन-तीन दिवसांपासून मान्सूनच्या ढगांच्या गडगडाटसह सरीवर सरी पडत असून, तालुक्यातील कोरड्या पडलेल्या नद्यांतून झुळझुळ पाणी वाहत निसर्गावर हिरवी झालर पसरत असल्याची वर्दी दिली आहे. आजमितीस महाड तालुक्यात २६० मिमी, तर पोलादपूरमध्ये ३१३ मिमी पाऊस पडला आहे. गतवर्षी जूनमध्ये महाडमध्ये फक्त ४३.१० तर पोलादपूरमध्ये १०३ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस या दोन तालुक्यांत २०१९ मध्ये झाला होता. जुलै व आॅगस्ट महिन्यात जास्त पाऊस पडला, तर हा पाऊस आॅक्टोबरपर्यंत लांबला होता. या वर्षी ३ जूनला चक्रीवादळाच्या दिवसापासून पाऊस सुरू असल्याने जास्त पावसाची नोंद झाल्याने जूनच्या पंधरवड्यात गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. महाडमध्ये ७.५३ टक्के पोलादपूरमध्ये ९.२९ टक्के पाऊस पडला आहे.तालुक्यातील गावागावांत मोठ्या प्रमाणात पावसाच्या सरीवर सरी पडत असतात. तालुक्यातील उन्हाळ्याच्या दिवसांत कोरड्या पडलेल्या ढवली, कामथी, धोडवलीसह इतर नद्यांमध्ये पाणी साचल्याने नद्यांचे अस्तित्व दिसून येत आहे. शेतीची विविध कामे सुरू असल्याने खरेदीसाठी अनेक शेतकरी बाजारपेठेमध्ये येत आहेत. मात्र, महाडसह पोलादपूर बाजारपेठेमध्ये सम-विषम दुकानांची अंमलबाजवणी सुरू केल्याने अनेक ग्राहकांना, तसेच शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. यामुळे मोठी गैरसोय होत आहे.पर्जन्यमापन केंद्रेपोलादपूरमध्ये तीन पर्जन्यमापन केंद्रे वाकण, कोंढवी, पोलादपूर तर महाडमध्ये महाड, बिरवाडी, तुडील, नाते, खरवली, करंजाडी अशी सहा कें द्रे आहेत. यामध्ये वाढ होण्याची गरज निर्माण झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील कुडपण, उमरठ, तुर्भे खोरा, कशेडी परिसर, तर महाड तालुक्यातील दासगाव, वरंध/माझेरी, किल्ले रायगड, वाळण-माघरुन आदी ठिकाणी पर्जन्यमापन केंद्रे उभारणेगरजेचे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी