शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई परिवहन सेवेकडून लेखी आश्वासन, तब्बल १० तासानंतरच वाहतूक पूर्वपदावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 16:54 IST

खोपटा येथे अपघातानंतर नातेवाईकांनी केलेले रास्तारोको मागे

मधुकर ठाकूर, उरण: पाच लाखांची आर्थिक नुकसान भरपाई, मृताच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी, जखमींना वैद्यकीय खर्च देण्याच्या नातेवाईकांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतरच गुरुवारी (८) खोपटा येथे अपघातानंतर सुरू करण्यात आलेले रास्तारोको मागे घेण्यात आले.त्यानंतरच सकाळपासून या मार्गावरील सलग १० तास बंद पडलेली वाहतूक पुर्ववत सुरू झाली.

नवीमुंबई परिवहन सेवेची एक वातानुकूलित प्रवासी बस प्रवाशांना घेऊन जुईनगर येथून कोप्रोलीकडे निघाली होती. सकाळी १० वाजता सुमारास खोपटा गावाजवळ रस्त्यावरुन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसने एका मालवाहु टेम्पोसह तीन दुचाकींना जोरदार धडक दिली.या बसच्या धडकेत एक तरुणाचा मृत्यू झाला.तर एक इसम गंभीररीत्या जखमी झाला आहे.या अपघातानंतर संतप्त झालेले मृत, जखमींने नातेवाईक आणि जमलेल्या ग्रामस्थांच्या जमावाने या रस्त्यावरील धावणारी वाहतुकच बंद करून रास्ता रोको केले.

मृत आणि जखमी झालेल्या इसमांच्या कुटुंबातील आर्थिक नुकसान भरपाई देण्याचा निर्णय होत नाही आणि त्यांना न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका घेतली.यामुळे सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.वाहतुकच बंद करण्यात आल्याने या मार्गावर हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

दरम्यान पहिल्या फेरीत उरणचे आमदार यांनी नातेवाईकांशी केली .मात्र फिस्कटलेल्या चर्चेतुन काही एक निष्पन्न झाले नाही.त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ताही मोकळा झाला नाही.फिस्कटलेल्या बैठकीनंतर दुसऱ्यांदा नवीमुंबई परिवहन सेवेचे अधिकारी,मृत ,जखमींचे नातेवाईक, पोलिस आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.

बैठकीत झालेल्या चर्चेत मृताच्या कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई, जखमींना वैद्यकीय खर्च आणि मृताच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरी देण्यावर सहमती नातेवाईकांनी संमती दर्शवली.यासाठी संबंधित विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच आश्वासनाची पुर्तता केली जाणार आहे. नातेवाईकांना दिलेल्या लेखी आश्वासनानंतरच सकाळ १० वाजता सुरू करण्यात आलेले रास्तारोको आंदोलन रात्री ८ वाजता मागे घेण्यात आले असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.नातेवाईकांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतल्यानंतर तब्बल १० तासांनंतर या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक संजय पवार यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण